Ajit Pawar on RR Patil Bet story: तासगाव – कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होणार अशी चिन्ह दिसत आहे. एकाबाजूला स्व. आर. आर. पाटील यांचा २५ वर्षांचा चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा उमेदवार रोहित पाटील निवडणुकीला पहिल्यांदाच उभा आहे. तर त्याच्या विरोधात सागंली जिल्ह्याचे दोन वेळा खासदार राहिलेले भाजपाचे नेते संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. तसेच तासगाव – कवठे महांकाळचे मातब्बर नेते अजित घोरपडे यांचीही त्यांना यावेळी साथ लाभली आहे. दरम्यान आज संजयकाका जगतपात यांचा अर्ज भरायला गेले असताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याशी निगडित काही कडू-गोड आठवणी सांगितल्या. तसेच २००४ साली पैज हरल्यामुळे आबांना नवीकोरी गाडी द्यावी लागली होती, असेही अजित पवार म्हणाले.

हे वाचा >> “आर. आर. पाटलांनी माझा केसानं गळा कापला, फडणवीसांनी मला…”, अजित पवारांचा धक्कादायक खुलासा

rohit patil replied to ajit pawar allegation
“आर. आर. पाटलांनी केसानं गळा कापला” म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Ajit Pawar
Ajit Pawar : “एकदा गृहमंत्रिपद द्या, असं मी वरिष्ठांना सांगायचो, पण…”, अजित पवारांचं वक्तव्य; आर. आर. पाटलांचा उल्लेख करत म्हणाले…
Sarad pawar
Sharad Pawar : “साहेब डोळ्यात पाणी आणतील म्हणणाऱ्यांनी काल…”, शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल; सहा महिन्यांपूर्वीच्या टीकेचा समाचार
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याशी निगडित मुंबईतील हल्ल्यानंतरची आठवण सांगितली. ते म्हणाले, एका पत्रकार परिषदेत आबा “बडे बडे शेहरों मे..”, हे विधान बोलून बसले आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी चर्चा न करता राजीनामा देऊन टाकला आणि गावाला जाऊन बसले. दहा – पंधरा दिवस लोक येऊन भेटत होते, मग नंतर कुणी यायला तयार झाले नाही. आबांनी मला फोन करून ही व्यथा सांगितली. मी ताबडतोब हेलिकॉप्टर पाठवून त्यांना मुंबईत आणलं आणि पक्षाचे प्रांताध्यक्षपद दिले. नंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले, असे अजित पवार म्हणाले.

पैज हरलो म्हणून नवीकोरी गाडी दिली

अजित पवार पुढे म्हणाले, २००४ साली आर. आर. आबा म्हणाले की, आपण काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकणार. मी म्हणालो, शक्य नाही आणि शक्य झालं तर माझ्याकडून तुला नवीकोरी गाडी देईल. निकालानंतर खरंच तसं झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले. मी क्षणाचाही विचार न करता स्कोडा कंपनीची सुपर गाडी आबाकडे पाठवून दिली.

१९९९ साली संजयकाका पाटीलला आर. आर. पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यापासून मी रोखले होते. साताऱ्यात सर्किट हाऊसला संजयकाकाला बोलावून निवडणूक अर्ज दाखल न करण्याबाबत सूचना दिल्याची आठवण अजित पवार यांनी सांगितली. तू अर्ज भरलास तर आर. आर. पाटील पडेल, असे सांगितल्यानंतर संजयकाका जगताप यांनी अर्ज मागे घेतला. त्याबदल्यात त्यांना विधानपरिषद दिली. मी शब्दाचा पक्का आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.