राज्यातील महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. या अपघातात काहींना प्राण गमवावे लागतात किंवा गंभीर जखमी होतात. अशा अपघातग्रस्तांना तत्काळ प्रथमोपचार मिळावे, यासाठी महामार्ग पोलिसांनी मृत्यूंजय दूत संकल्पना राबविली. १ मार्च २०२१ पासून राबविलेल्या या संकल्पनेतून डिसेंबर २०२१ पर्यंत ८१५ जणांचे जीव मृत्यूंजय दूतांनी वाचविले आहेत. महामार्गांलगतच्या गावातील ग्रामस्थ, पेट्रोल पंप व ढाब्यावर काम करणारे कर्मचारी, सामाजिक संस्था आदींचा समावेश मृत्यूंजय दुतांमध्ये आहे.

अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘गोल्डन अवर्स‘महत्वाचा ठरतो. त्यासाठी राज्य शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही उपलब्ध केली आहे. परंतु एखादा वाहनाचा अपघात झाल्यास रुग्णवाहिका येण्याची वाट न पाहता अपघातग्रस्तांना जवळच उपस्थित असलेल्यांकडून त्वरित प्रथमोपचार मिळावे आणि त्याबरोबरीने रुग्णालयातही दाखल करण्यासाठी प्रयत्न व्हावे, यासाठी महामार्ग पोलिसांनी महामार्गांजवळील गावकरी, पेट्रोल पंप, टोल नाके व ढाब्यावरील कर्मचारी, दुकानदार यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना मृत्यूंजय दूत हे नाव देऊन १ मार्च २०२१ पासून अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी नवीन संकल्पना सुरु झाली.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा

ठाणे, पुणे, रायगड, नागपूर, औरंगाबाद महामार्ग परिक्षेत्रात एकूण ५ हजार ३२८ मृत्यूंजय दूत कार्यरत आहेत. १ मार्च २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत या महामार्ग परिक्षेत्रात मृत्यूंजय दुतांनी ४६० अपघातांमध्ये ९४१ अपघातग्रस्त व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यातील ८१५ जणांचे प्राण वाचल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. ठाणे महामार्ग परिक्षेत्रात सर्वाधिक ३७२ अपघातग्रस्त व्यक्तींना मत्यूंजय दूतांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील ३०२ जणांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले. त्यापाठोपाठ पुणे महामार्ग परिक्षेत्रात २९६ अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यातील २८१ जणांचे जीव वाचल्याची माहिती दिली. तर रायगडमध्ये १५२, नागपूर परिक्षेत्रात ४५ आणि औरंगाबाद परिक्षेत्रातील ३५ जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे.

गावकरी, पेट्रोल पंप, टोल नाके व ढाब्यावरील कर्मचारी, दुकानदार यांची मदत घेऊन मृत्यूंजय दूत संकल्पना राबवण्यात आली. ठाणे महामार्ग परिक्षेत्रात ६१६, पुणे महामार्ग परिक्षेत्रात सर्वाधिक २,८४०, रायगड भागात ३५१, नागपूर परिक्षेत्रात ८१४ आणि औरंगाबाद परिक्षेत्रात ७०७ दूत असल्याची माहिती देण्यात आली.