सोलापूर : अवकाळी पावसाच्या पाठोपाठ रोहिणी नक्षत्राच्या पावसामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळत असून शहर व जिल्ह्यातील काही भागात मागील तीन दिवसांपासून कमीजास्त प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी दुपारी आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पावसाला प्रारंभ झाला. नंतर पाऊस थांबला तरी आकाश ढगांनी भरले होते.

सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आदी तालुक्यांत तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. करमाळा तालुक्यातही एकाच दिवशी ३२.७ मिलीमीटर इतका दमदार पाऊस झाला. पंढरपूर, सांगोला, माळशिरस व अन्य भागांतही पावसाला समाधानकारक सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात पिकांच्या पेरण्यांची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांचा हुरूप वाढला आहे.

Zika, Pune, rural areas, patients,
पुण्यात झिकाचा धोका वाढला! ग्रामीण भागातही शिरकाव; जाणून घ्या कुठे वाढताहेत रुग्ण…
Due to heavy rains in Ulhas valley water level of Ulhas Bhatsa Bharangi Kalu rivers has increased
उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास, भातसा, भारंगी, काळू नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
anger among citizens over power outage in amrutdham area of panchavati zws 70
अमृतधाम परिसर विजेच्या लपंडावामुळे त्रस्त – रोजच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये रोष
kolhapur river
कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Due to lack of road in Nandurbar district tribal were tortured to death
बांबूच्या झोळीतून नेतांना रस्त्यातच प्रसुती; नंदुरबार जिल्ह्यात रस्त्याअभावी आदिवासी बांधवांना मरणयातना
Farmers are waiting for heavy rains
उरण : शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
Leakage , CETP, pipe, Ichalkaranji,
इचलकरंजीत काळ्या ओढ्यावर ‘सीईटीपी’च्या जलवाहिनीस गळती; मल्लनिसारण जलवाहिनी फुटल्याने मैला पंचगंगेत
Crowds in the market to buy raincoats umbrellas thane
बाजारात रेनकोट, छत्र्या खरेदीसाठी गर्दी; छत्र्या – रेनकोटच्या दरात वाढ

हेही वाचा – खासदार विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा

हेही वाचा – वेळ… आज तुमची, उद्या माझी येईल – चंद्रहार पाटील

उत्तर सोलापूर तालुक्यात २४.२ मिमी पाऊस झाला असून तीन दिवसांत ६०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अन्य तालुक्यांमध्ये पडलेला आणि १ ते ६ जूनपर्यंत पडलेला पाऊस कंसात असा –

दक्षिण सोलापूर- १०.२ (२५.९), बार्शी- ९.३ (१४.४), अक्कलकोट- ४.५ (३१.९), मोहोळ- १५.९ (५७.७), माढा- ७.९ (३६.९), करमाळा – ३२.७ (५३.२), पंढरपूर – २४.१ (२८.१), सांगोला – १५.६ (१७.५), माळशिरस – ११.२ (२५.३) आणि मंगळवेढा – ३.९ (४.५). जिल्ह्यात एकाच दिवशी सरासरी १४.२ मिमी पाऊस झाला असून १ जून ते ६ जूनपर्यंत सरासरी ३०.७ मिमी पाऊस झाला आहे. रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी शहर व परिसरात पावसाळी वातावरण पाहायला मिळाले असून उद्या शुक्रवारी मृग नक्षत्राला प्रारंभ होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.