scorecardresearch

अलिबाग : संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट; कामकाज ठप्प, शाळा आणि आरोग्य सेवेवर परिणाम

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

strike old pension scheme Alibaug
अलिबाग : संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अलिबाग – जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. शाळा आणि आरोग्य यंत्रणेवरही संपाचा परिणाम झाला आहे.

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळत आहे. कामकाज ठप्प झाले असून कर्मचारी संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा – हृदयद्रावक! बोअरवेलमध्ये पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; अहमदनगरच्या कोपर्डी तालुक्यातील घटना

जिल्ह्यातील १५ हजार कर्मचारी आणि शिक्षक या संपात सहभागी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे. संपात राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायतमधील कर्मचारी व शिक्षक संघटना सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नविन राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) लागू केली आहे. ही योजना अन्यायकारक असून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सातत्याने विविध आंदोलन करीत आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन हजार कर्मचारी संपावर; कामकाज ठप्प

संघटनांच्यावतीने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर कर्मचारी निदर्शने करणार आहेत, थोड्याच वेळात या मोर्चाला सुरवात होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 11:57 IST
ताज्या बातम्या