राज्यात दिवसभरात १ हजार २० रूग्ण करोनामधून बरे झाले असून, ९९९ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर ४९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६६,९१३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६४ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,२३,३४४ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४०५६५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,३८,६३,२८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,२३,३४४ (१०.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,१९,४३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १०२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १२,२१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.