सातारा जिल्ह्यातील कोयना धरण व सांगली परिसरातील काही गावांना आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा धक्का ३.५ रिश्टर स्केलचा असल्याचे सांगण्यात येते. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २१ कि.मी. अंतरावर वारणेतील जवळे गावात असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. सुदैवाने या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागातही आज पहाटे ५.२० मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

सातारा जिल्ह्यातील कराडसह कडेगाव तालुक्यातील वांगी, सोनहिरा खोरे येथे भूकंपाचे धक्के जाणवले. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख, संगमेश्वर, चिपळूण येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे समजते.