Ajit Pawar NCP faction: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटात ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरू नये, यासाठी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अद्याप या प्रकरणी सुनावणी पूर्ण झालेली नाही. तत्पूर्वी घड्याळ चिन्ह वापरताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. आता अजित पवार गटाने टीव्हीवर प्रदर्शित केलेल्या व्हिडीओ जाहिरातीवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.

‘आता घड्याळाचे बटन दाबणार, सर्वांना सांगणार’ या जाहिरातीला महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने नकार दिला आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रवादीने राज्यस्तरीय प्रमाणिकरन समितीसमोर निवडणूक प्रचारासाठी आपल्या टीव्ही जाहिरातीच्या पूर्व-प्रमाणिकरणासाठी अर्ज केला होता. तथापि, राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ जाहिरातीमध्ये दिलेल्या काही भागावर आक्षेप घेतला आहे, एक पत्नी आपल्या पतीला विनोदाने म्हणते, “आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या नाहीतर आज रात्री मी तुम्हाला खायला घालणार नाही.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे वाचा >> “मी शरद पवारांना सोडलेलं नाही”, ऐन निवडणुकीत अजित पवारांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याचं कारणही सांगितलं

एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. पोल बॉडीने जाहिरातीतील संभाषण “पत्नीकडून नवऱ्याला दिलेली धमकी” असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे आणि पक्षाला जाहिरात प्रसारीत करण्यासाठी हा भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनाई करावी, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने २ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबर रोजी फेटाळली. न्यायमूर्ती म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू शकते. मात्र त्यांना या निवडणूक चिन्हाबरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागेल.

Story img Loader