पनवेल संघर्ष समितीने केली होती लेखी तक्रार

पनवेलः कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांना आज मुंबई ईडी झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी  त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. राज्य शासनाचे गृहखाते अटकेची कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तीन महिन्यांपूर्वी पनवेल संघर्ष समितीने ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांच्याकडे लेखी कैफियत मांडली होती. त्यानुसार अखेर आज अटक झाली.

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बॅकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला आ. विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बॅकेत गैरव्यवहार केला होता. मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला

रिझर्व्ह बँकेचे सहकार आयुक्तांना आदेश

रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परिक्षक यु. जी. तुपे यांची नियुक्ती करून पूर्नतपासणी केल्यानंतर ६३ कर्ज खात्याद्वारे ५१२ कोटीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा ५२९ कोटीवर गेला आहे.

पनवेल संघर्ष समितीने सहकार खाते, गृहखात्याच्या गुप्तवार्ता विशेष गुन्हे शाखा (सीआयडी) आणि ईडीच्या प्रमुखांना भेटून सखोल चौकशी आणि आरोपींच्या अटकेची मागणी करत पाठपुराव्याचा रेटा लावला होता. त्यानुसार सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधववार यांनी दिलेल्या निर्णयावर पनवेल संघर्ष समितीने आक्षेप घेत पूर्नचौकशीची मागणी सहकार सचिवांकडे केली आहे.

सीआयडीच्या उपअधिक्षक सरोदे यांच्याकडे तगादा लावल्यानंतर त्यांनी विवेक पाटलांसह, अभिजित पाटील आणि सावंत यांची वाहने जप्त करण्याची कारवाई केली होती.

राज्याच्या ईडीचे मुख्य विशेष संचालक सुशिल कुमार यांची भेट घेवून संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी कर्नाळा बँकेच्या प्रारंभापासूनच्या व्यवहाराची चौकशी करून संबंधित घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सुशिल कुमार यांनी गुन्ह्याचा तपास झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांच्याकडे सोपविला होता. सध्या महत्वाचे गुन्हे तपासासाठी असल्याने दोन त तीन महिन्यात ही केस दाखल करण्यात येईल, असे आश्‍वासन सुशिल कुमार यांनी कांतीलाल कडू यांना दिले होते. आज मंगळवारी (ता. १५) सुनील कुमार यांनी विवेकानंद पाटील यांना अटक केली आहे.

कर्नाळा बँकेचा ईडी स्वतंत्ररित्या  तपास करणार असल्याने आता कुणाकुणावर अटकेची कारवाई होते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, पनवेल संघर्ष समितीच्या कर्नाळा बँक लढ्याला मोठे यश आले आहे.