आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी ते ईडी कार्यालयातही दाखल झाले आहेत. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“भारत सरकारच्या तपास यंत्रणा कशाप्रकारे वापरल्या जातात हे आपण देशभरात पाहतोय. त्याचा वापर पहिल्यांदा माझ्यावरच झाला. त्याआधी ईडी हे प्रकरण काय आहे हे कोणाला माहितही नव्हतं, असं छगन भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “वेळोवेळी देशभरामध्ये केवळ दबावासाठी मन मानेल अशा रितीने ईडीचा वापर केला जातोय. सुप्रिम कोर्टातही त्यादिवशी सांगण्यात आलं की भीती निर्माण करू नका. दहशतीचं वातावरण निर्माण करू नका. लोकशाही मार्गाने विरोध करणे, निषेध करणं एवढंच आपल्या हातात आहे. आमच्याकडून कोणतंही चुकीचं पाऊल उचललं गेलेलं नाही. कितीही वेळा त्यांनी चौकशी केली तरी काहीही निष्पन्न होणार नाही.”

State president of NCP Sharad Pawar faction Jayant Patil criticizes BJP
जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”

हेही वाचा >> ईडी चौकशीला हजर राहण्याआधीच जयंत पाटलांचं ट्वीट; म्हणाले, “ईडीचे समन्स आल्यापासून…”

“त्यांनी (भाजपाने) सांगतिलं आहे की त्यांच्याकडे लॉन्ड्री आहे. त्यांच्याकडे धुलाईची पावडर गुजरातहून येते. अशा प्रकरणात त्यांच्याकडे गेल्यास त्या मशिनमध्ये त्यांना टाकलं जातं, मग त्या पावडरने त्यांना स्वच्छ केलं जातं”, असा उपरोधिक टोलाही छगन भुजबळ यांनी यावेळी लगावला.

जयंत पाटलांची ईडी चौकशी

जयंत पाटील राज्याचे माजी गृह आणि माजी अर्थमंत्री आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सातवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांना शुक्रवारी सकाळी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने बोलावले होते. पण त्यांनी या समन्सबाबत ईडीला पत्र लिहून वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ईडीने जयंत पाटील यांना आठवड्याभराची मुदत दिली आहे. पाटील यांना ईडीने दुसरे समन्स बजावले असून त्यात २२ मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आयएल अॅण्ड एफएसने दिलेल्या संशयास्पद कर्जप्रकरणी पाटील यांची ईडी चौकशी करणार आहे.

कार्यकर्ते आक्रमक

इस्लामपूरचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर ईडी आणि भाजापाविरोधात आंदोलन पुकारले आहे. जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात येत असून जयंत पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरबाजीही करण्यात आली आहे. दरम्यान, संभाव्य परिस्थिती टाळण्याकरता राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.