scorecardresearch

नागपुरात नाना पटोलेंच्या वकिलाला ईडीने घेतलं ताब्यात; फडणवीसांविरोधात याचिका केल्याने आले होते चर्चेत

नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीचा छापा

नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आज सकाळी छापेमारी केली. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते. जमिनीच्या व्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीनंतर ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतलं. सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते.

आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगरातील घरी छापेमारी सुरू केली. काही अधिकारी हे उके यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ईडीचे नऊ अधिकारी आणि दोन महिला अधिकारी उके यांच्या घरात दाखल होते. तसंच सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. सतीश उके यांच्या घराबाहेर परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ed raid on congress nana patole lawyer satish uke in nagpur sgy