काही दिवसांनी अनिल देशमुखांची तुरूंगात रवानगी होणार – किरीट सोमय्या

अनिल परब यांची देखील अशीच अवस्था होणार, असल्याचंही म्हणाले आहेत.

At that moment the CBI and ED will arrest Anil Deshmukh says Kirit Somaiya
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख यांच्यावर टीका केली

सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज(शुक्रवार) सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापा टाकला. तसेच, ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा  ईडीकडून कारवाई झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करत, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. काही दिवसांनी अनिल देशमुखांची रवानगी तुरूंगात होणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखचा घरी आज ED ईडीचे छापे, काही दिवसांनी जेलमधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकाता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

तसेच, ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांच्या घरी छापा मारला. मला खात्री आहे काही दिवसांनी ते तुरूंगात असतील. दुसरे वसुली मिनिस्ट अनिल परब यांचे देखील अनिल देशमुखांप्रमाणेच होईल. असंही किरीट सोमय्यांनी ट्विट केलं आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा

गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील घरी व निकटवर्तीयांकडे धाड टाकली. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ed raided cm uddhav thackerays vasooli minister anil deshmukh residence i am sure in few days he will be in jail kirit somaiya