मलेरियावर प्रभावी औषधाची निर्मिती

सध्या ते प्राण्यांवर वापरले जाणार आहे.

हैदराबाद विद्यापीठातील संशोधकांनी मलेरियाच्या प्लास्मोडियन फाल्सिपारम या परोपजीवी जंतूला मारणारे प्रभावी औषध तयार केले आहे. हे औषध बहुवारिक म्हणजे पॉलिमरवर आधारित नॅनोमेडिसिन आहे. त्याची निर्मिती करण्यात हैदराबाद विद्यापीठाच्या स्कूल ऑफ  इंजिनीयरिंग सायन्सेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेचे सहयोगी प्राध्यापक प्रदीप पाइक यांचा सहभाग आहे. प्रा. पाइक यांनी सांगितले, की नवीन औषध हे प्लास्मोडियम फाल्सिपारम या परोपजीवी जंतूला मारण्यात अतिशय प्रभावी ठरले आहे. सध्या ते प्राण्यांवर वापरले जाणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरिया हा घातक रोग असून दरवर्षी २१२ दशलक्ष लोकांना त्याचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे वर्षांला ४ लाख २९ हजार लोक मरतात. डॉ. पाइक यांच्या गटाने पॉलिमर्सच्या सच्छिद्र कॅप्सूल तयार केल्या आहेत. त्यांच्या मदतीने मलेरियाला रोखता येते. वेळ व शरीराचे तापमान या प्रारूपावर आधारित असलेल्या या औषधाची योग्य मात्रा शरीरात वेळोवेळी सोडली जाते. त्यामुळे प्लास्मोडियम फास्लिपारमची लागण तांबडया रक्तपेशींना होत नाही. या संशोधनात पाइक यांच्यासमवेत हिमाद्री मेधी, सोमदत्ता मैती, निरंजन सुथराम, सुरेश कुमार चलापरेडी, प्रा. मृणाल कांती भट्टाचार्य यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Effective medicine creation in malaria

ताज्या बातम्या