लातूर जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधचे मनसुबे उधळले ; ९ जागांसाठी निवडणूक

निवडणूक निर्णयाच्या प्रक्रियेच्या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आवाज उठवला.

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर :  लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी गटाच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या. आता ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपने पहिल्यांदाच १९ जागांवर उमेदवार उभे केले होते. अर्ज दाखल केल्यानंतर छाननीच्या दिवशीच केवळ विरोधकांचे सर्वच्या सर्व अर्ज अवैध ठरवण्यात आले. निवडणूक निर्णयाच्या प्रक्रियेच्या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आवाज उठवला. थेट राज्यपालांकडे याबाबतची तक्रार करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी खटले दाखल करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज देण्यात आला. जिल्हा बँकेच्या गैरकारभाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. सोमय्यांनी लातुरात पत्रकार परिषद घेऊन देशमुखांच्या गैरकारभाराच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले.

सहकार सहसंचालकांकडे विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने आपले अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत याबद्दलची तक्रार दाखल केली व याची दखल घेत सहसंचालकांनी विरोधी उमेदवारांचे ९ अर्ज वैध असल्याचा निकाल दिला.

आ. धीरज देशमुख, आ. बाबासाहेब पाटील अन्य दोघांच्या विरोधात विरोधकांनी उच्च न्यायालयात त्यांची उमेदवारी रद्द करण्यासंबंधी दाद मागितली होती मात्र उच्च न्यायालयाने त्या सर्वाचे अर्ज वैध ठरवत असल्याचे जाहीर केले. सोमवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्हा बँकेची निवडणूक अपरिहार्य ठरत ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. देवणी व शिरूर अनंतपाळ सोसायटी मतदारसंघ, मजूर सहकारी संस्था मतदारसंघ, इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघ, विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघ, अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघ तसेच नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातील प्रत्येकी एक तर महिला प्रतिनिधी मतदारसंघातील दोन अशा ९ जागांसाठी मतदान होणार आहे.

सत्ताधारी व विरोधकात यासाठी सरळ लढत होणार असून एकूण १८ उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. २१ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

राज्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच बँका नफ्यात चालतात व त्यांचे कामही चांगले आहे. त्यात लातूर जिल्हा बँक अग्रणी आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बँकेच्या हितासाठी आजवर प्रयत्न केले. ही निवडणूक ९ उमेदवारांसाठी नसून दिलीपराव देशमुखांच्या प्रतिष्ठेची परीक्षाच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Efforts to make the election in latur district central co operative bank unopposed zws

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या