तीस वर्षांहून अधिक काळ भाजपात राहून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा भाजपात परतणार असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. पक्ष सोडण्याचा संपूर्ण ठपका देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवून त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु, आता ते पुन्हा भाजपात सामिल होण्याच्या चर्चांना वेग आला आहे.

भारतीय जनता पक्षाशी ३० हून अधिक वर्षे एकनिष्ठ राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पक्षांतर्गत वाद, भोसरी भूखंड घोटाळा, देवेंद्र फडणवीसांशी मतभेद आदी विविध मुद्द्यांवरून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. २०२० मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तत्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आलं. तेव्हापासूनच त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली. बुथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या होत्या. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली. त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
CM Eknath Shinde
शिवसेनेच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, ‘या’ नेत्याचं नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

हेही वाचा >> रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे सामना होणार का?, एकनाथ खडसे म्हणाले, “आम्ही…”

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. एकनाथ खडसेंनाच या जागेवरून उमेदवारी मिळाल्यास सून-सासरे असा जंगी सामना रंगण्याची शक्यता होती. परंतु, या जागेवरून तीन ते चार उमेदवार इच्छुक असल्याचं एकनाथ खडसेंनीच स्पष्ट केलं होतं. दरम्यान, या काळात एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात सामील होण्याच्या चर्चांना जोर धरला. याच काळात त्यांनी दिल्लीवारी केल्याने या चर्चांना बळ मिळालं. परंतु, आपण भाजपात जाणार असल्याच्या अफवा असल्याचं खडसेंनी वारंवार मान्य केलं. तसंच, या चर्चांना रक्षा खडसे यांनीही पूर्णविराम दिला होता.

परंतु, या चर्चा सुरू असतानाच टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एकनाथ खडसे भाजपात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून सूनेविरोधात लढण्यास नकार दिल्यानंतर ते पुन्हा भाजपात परतणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.

राजकीय पुनर्वसन होणार का?

एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांचा भाजपात येऊन फायदा काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. एकनाथ खडसे पुन्हा भाजपात आले तर त्यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.