विधान परिषदेचे सभागृहनेतेपदी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची, तर उपनेते म्हणून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली.  सभापती शिवाजीराव देशमुख यांनी ही घोषणा केली. खडसे यांनी गेल्या काही दिवसांत वादग्रस्त वक्तव्ये केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज होते. खडसे यांना आवर घालण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची निवड होणार होती. ज्येष्ठतेनुसार हे पद आपल्याला मिळावे, असा खडसे यांचा आग्रह होता.