Eknath Khadse : मी मुख्यमंत्रिपदाची किंवा मंत्रिपदाची अपेक्षा सोडून दिली आहे. ज्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भाजपाचे १२३ आमदार निवडून आणून दाखवले होते त्यामुळे त्यावेळी माझा मुख्यमंत्रिपदासाठीचा पहिला दावा होता. असं एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्याकडे एक सीडी होती असाही दावा एकनाथ खडसेंनी केला आहे. तसंच दोन नेत्यांना कंटाळून मी भाजपा सोडली. सध्या जे काही राजकारण चाललं आहे त्या राजकारणात मला मुख्यमंत्रिपदही नकोच आहे असंही एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) म्हणाले.

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला अत्यंत घाणेरडं राजकारण

सध्याच्या घडीला महाराष्ट्र घाणेरडं राजकारण अनुभवतो आहे. तसंच सध्या मुख्यमंत्री एका पक्षाचा होऊच शकत नाही अशी स्थिती आहे. अशा स्थितीत मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा मुळीच नाही असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं. दुसऱ्याला आवरता आवरता किती सावरावं लागतंय आपण पाहतोय मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा इतर. निवडणूक आल्यावर कशी धावपळ होते ते सगळे बघत आहेतच. असंही एकनाथ खडसे म्हणाले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी हे वक्तव्य केलं आहे.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
JP Singh met Afghanistan Interim Defense Minister Maulana Mohammad Yakub in Kabu
तालिबानी राजवटीशी पहिलाच संवाद!
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

काही लोकांनी राजकारणाचा चिखल केला

काही एक-दोन व्यक्तींनी राजकारणाचा चिखल झाला आहे. मी नाव न घेता सांगेन की एका व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. ते नाव मी घेण्याची गरज नाही ते कुणालाही विचारा माहीत आहे. सूडाचं राजकारण, फोडाफोडीचं राजकारण सगळं महाराष्ट्रात घडलं आहे, त्याला एक व्यक्ती जबाबदार आहे असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. ईडी, सीबीआय या यंत्रणांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. नीरव मोदीला का सोडलं आहे? माझ्या प्रकरणात माझा काय दोष आहे? मला सांगा. मला अकारण यामध्ये गोवण्यात आलं आहे, असंही खडसे ( Eknath Khadse ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis: ‘फडणवीसांनी मुलीची शपथ घेतली होती’, खडसेंच्या त्या गौप्यस्फोटवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “केंद्रीय नेतृत्वाने…”

सीडीबाबत काय म्हणाले एकनाथ खडसे?

“ईडी म्हणाले म्हणून मी सीडी म्हटलं होतं. यमक जुळवून मी बोललो. माझ्याकडे काही कागदपत्रं आणि व्हिज्युअल्स होते. माझ्या मोबाइलमधला व्हिडीओ भाजपाच्या वरिष्ठांनाही दाखवला होता. बघा मुलीबरोबरचे चाळे. मी तो व्हिडीओ कुणाचा होता ते सांगणार नाही. मात्र नंतर मलाच समजलं नाही की मोबाइलमधून तो व्हिडीओ कसा डिलिट झाला. मी शपथेवर सांगतो मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडे भाजपा नेता मुलीबरोबर चाळे करत होता हे व्हिज्युअल्स होते. मी ते भाजपाच्या वरिष्ठांना दाखवले होते. दिल्लीतल्या काही वरिष्ठांना दाखवलं होतं. त्यांनी ते पाहिलं होतं हे निश्चित. मला मोबाइल फार समजत नाही. १५ ते २० दिवस तो व्हिडीओ होता. मी पत्रकारांनाही दाखवलं होतं. मला थोडी भीतीही होती की याचा गैरवापर होईल.” असं एकनाथ खडसेंनी ( Eknath Khadse ) म्हटलं आहे.

ज्याने मला व्हिडीओ दिला होता त्याला मॅनेज करण्यात आलं

मी माझ्या पीएला सांगितलं होतं की दुसरा मोबाइल आण आणि त्यात ट्रान्सफर कर. पण ते त्यावेळी काही झालं नाही. पण ते होतं हे निर्विवाद सत्य आहे. दुर्दैवाने ते डिलिट झालं. तुम्हाला जी नावं माहीत आहेत त्यांच्यापैकीच हा एक भाजपाचा नेता आहे. ज्याने मला हा व्हिडीओ दिला होता त्याला मॅनेज करुन टाकलं. त्याला एक फ्लॅट पाच ते दहा कोटी रुपये हे सगळं दिलं. आता तो माणूस त्यांच्या बाजूने आहे. त्याची आता २५ कोटींची प्रॉपर्टी आहे. सगळ्यांना माहीत आहे तो माणूस कोण आहे. हातात पुरावा नाही त्यामुळे मला फार बोलता येत नाही. कुणाचं काय चारित्र्य आहे सगळ्यांना माहीत आहे.” असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.