देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस आली आणि काय त्यांचा तळफळा सुरु झाला, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. ते जळगावात एका कार्यक्रमात बोलत आहे.

“एक नोटीस आली आणि आपली पिळवणूक होत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मी भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरू झाली, असा दावा करत आहेत. तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो हे तुम्हाला माहिती पडताच तुम्ही माझी पिळवणूक सुरू केली,” असा आरोप एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर केला.

sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Raj Thackeray Uddhav Thackeray
आगामी काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊत म्हणाले, “दोन्ही भाऊ एकत्रच आहेत, फक्त…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

“…मग हे स्पष्ट होईल की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय”, देवेंद्र फडणवीसांचा निशाणा!

“माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बायको बरोबर माझे संबंध जोडले. अंजली दमानिया यांना माझ्यावर आरोप करायला लावलं, हे उद्योग कोणी केले?, असा सवाल एकनाथ खडसेंनी केला. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या कालखंडात माझे फोन टॅब झाले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. शिवाय फोन कोणाचे टॅप होतात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, त्यांचेच फोन टॅप होतात. माझे काय देशद्रोहीसोबत संबंध आहे का?,” असा थेट सवाल एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला.

“तुम्ही आजपर्यंत विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचं काम केलं, म्हणूनच माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची वेळ आली,” असं एकनाथ खडसे म्हणाले.