ठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... | eknath shinde comment on rashmi thackeray thane tembhi naka visit | Loksatta

ठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात सहभागी झाल्या.

ठाकरे गटाचे टेंभी नाक्यावर शक्तीप्रदर्शन, रश्मी ठाकरेंनी महाआरती केल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
एकनाथ शिंदे आणि रश्मी ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात सहभागी झाल्या. येथे रश्मी ठाकरे यांनी देवीची महाआरती केली. यावेळी रश्मी ठाकरे तसेच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रश्मी ठाकरेंनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. दरम्यान, रश्मी ठाकरेंनी केलेल्या महाआरतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवीचे दर्शन कोणीही घेऊ शकतो. रश्मी ठाकरे यांनीही दर्शन घेतले असेल, तर चांगली गोष्ट आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> अतिवृष्टीग्रस्तांना साडेचार हजार कोटींची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती; राज्यात २० हजार पोलिसांची भरती होणार

“देवीचे दर्शन घेण्यास कोणालाही बंदी नाही. दर्शन सर्वांनीच घेतले पाहिजे. त्यांनीही देवीचे दर्शन घेतले असेल तर चांगलीच बाब आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत असून या उत्सवाला गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर ठाकरे गटाकडून देवीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या उत्सवाला उपस्थिती लावण्याआधी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

हेही वाचा >>> बाळासाहेब, वाघ, शिवसेनेसह धनुष्यबाण; एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर सगळी चित्रे झळकली

तसेच, त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट दिली. संजय राऊत हे कारागृहात असताना अशा कठीण प्रसंगात ठाकरे कुटुंबीय राऊत यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी राऊत यांच्या कुटुंबीयांना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अतिवृष्टीग्रस्तांना साडेचार हजार कोटींची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती; राज्यात २० हजार पोलिसांची भरती होणार

संबंधित बातम्या

VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”
राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त
“मी काय अंगठाछाप मंत्री, वेडा वाटलो का?,” हाफकिनसंबंधी ‘त्या’ वक्तव्याबाबत विचारताच तानाजी सावंत संतापले, नेमकं काय घडलंय?
“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा
“सुषमा अंधारेंच्या मेंदुला…” राज ठाकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेत्याची जीभ घसरली!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर