Eknath Shinde राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) २६ ऑगस्टपासून म्हणजेच पुतळा पडल्याच्या दिवसापासून जयदीप आपटे फरार होता. जयदीप आपटे ४ सप्टेंबरला अटक झाली आहे. जयदीप आपटे हा कल्याणला त्याच्या आई आणि पत्नीला भेटायला आलो होता, त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सात पथकं जयदीप आपटेच्या शोधात

जयदीप आपटेला शोधण्यासाठी मालवण पोलीस, ठाणे पोलीस आणि कल्याण ग्रामीण पोलिसांची सात पथकं कसून शोध घेत होती. मात्र, जयदीप आपटे त्यांच्या हाती लागला नव्हता. अखेर बुधवारी संध्याकाळी जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) स्वत:च कल्याणमधील त्याच्या घरी आला आणि अलगदपणे पोलिसांच्या तावडीत सापडला. 

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Rupali Patil Thombare VS Rupali Chakankar
NCP Ajit Pawar Group : “एकाच महिलेला किती पदे देणार?”, अजित पवार गटात वादाची ठिणगी? रुपाली पाटील-ठोंबरे विरुद्ध चाकणकर वाद चव्हाट्यावर
N. R. Narayana Murthy
N. R. Narayana Murthy : “माझ्यासारखं होऊ नको”, नारायण मूर्ती यांचा विद्यार्थ्याला सल्ला; म्हणाले, “माझ्यापेक्षा…”
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
Rahul Gandhi on Chhatrapati Shivaji Statue Collapse
Rahul Gandhi on Chhatrapati Shivaji Statue: पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदींनी माफी का मागितली? राहुल गांधींनी सांगितली तीन कारणे…

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून फरार होता जयदीप आपटे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. दुपारी १ वाजून १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी तर हळहळलेच. मात्र पुतळा पडल्याचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले त्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहेत. त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्त अतिशय नाराज झाले. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची माफी मागितली. तर विरोधकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. यानंतर शिल्पकार जयदीप आपटे ( Jaydeep Apte ) कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. त्याला शोधण्यासाठी पोलीस त्याच्या घरीही गेले होते. मात्र तो फरार झाला होता. तेव्हापासून जयदीप आपटेला ( Jaydeep Apte ) अटक करण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल या प्रकरणात कुणालाही सुटका नाही. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. विरोधकांना आम्ही चपराक लगावली आहे. जयदीप आपटेची चौकशी केली जाईल त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केलं तो प्रकार दुर्दैवी आहे. आम्ही आधीच सांगितलं की त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवरायांच्या नावाचं जे राजकारण केलं ते दुर्दैवी होतं. संजय राऊतांना तर ठाण्यातल्या एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले.

उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा दिल्लीतले लोक मातोश्रीवर यायचे आता यांना दिल्लीत जावं लागतं आहे. दिल्लीत जाऊन मला मुख्यमंत्री करा हे काँग्रेसला सांगावं लागतं आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्यावर अशी परिस्थिती होते. आम्ही विकासावर भर दिलाय, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.