राज्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे राजकीय टोलेबाजी देखील दिसून येत आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’फेम शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या बोलण्याच्या हटके शैलीमुळे सर्वशृत झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केलेल्या एका खोचक टीकेला शहाजीबापूंनी त्यांच्याच खास शैलीत उत्तर दिलं आहे. शहाजीबापूंच्या घरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर टीव्ही९शी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी अमोल मिटकरींच्या टीकेला तेवढ्याच खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

अमोल मिटकरींनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शहाजीबापू पाटील यांच्यावर खोचक टिप्पणी केली होती. “शहाजीबापू हे व्यक्तिमत्व म्हणजे शिंदे गटातील जॉनी लिव्हर आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस करमणूक म्हणून पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करू नये. शिंदे गटात त्यांचा कसा कार्यक्रम वाजला आहे, याची चिंता त्यांनी करावी. स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं. ते महाराष्ट्राची करमणूक करणारे नवे जॉनी लिव्हर आहेत”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
dhairshil mane
कोल्हापूर: खासदारांचा संपर्क नाही; ही विरोधकांची स्टंटबाजी, धैर्यशील माने
Rohit pawar and ajit pawar (1)
“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्याकरता…”, रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप
raj thackeray shrikant shinde marathi news, raj thackeray ulhasnagar firing case marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मनसेचे समर्थन कुणाला ? राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला

‘५० खोकी’, ‘आमदारांची नाराजी’ ते ‘ढगात गोळ्या’, शहाजीबापूंची पुण्यात तुफान टोलेबाजी!

“अमोल मिटकरी म्हणजे सोंगाड्या”

दरम्यान, अमोल मिटकरींच्या या टीकेवर शहाजीबापू पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. “अमोल मिटकरी हे राजकारणातले विचार करण्यासारखे पात्र नाहीत. आमच्याकडे एक नाऱ्या म्हणून सोंगाड्या होता. अमोल मिटकरी म्हणजे सोंगाड्या आहे. संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे त्यांची जागा आपल्याला मिळावी, म्हणून ते रोज टीव्हीवर नटून-थटून, दाढीला तेल लावून येत आहेत. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही”, असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मंगळवारी पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या शहाजीबापू पाटील यांची तुफान टोलेबाजी चर्चेत राहिली. यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टोला लगावला. “मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलो आहे. ते मला लक्ष्य करणार म्हणजे काय करणार? मी उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. त्यांनी तिथे राहावं. लोकांचं काम करावं आणि माझ्या मतदारसंघावर लक्ष ठेवावं”, असं ते म्हणाले.