शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड करुन राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आणला आहे. शिवसेनेचे ३५ पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बुधवारी सकाळी शिवसेना आमदारांना बैठकीचे पत्र पाठवत हजर न राहिल्यास अपात्रतेच्या कारवाईचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वाढत्या असंतोषाव्यतिरिक्त, महाराष्ट्रात गाजत असलेल्या राजकीय नाटकातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील पक्षपातळीवर वर्षानुवर्षे चालत आलेली मैत्री.

इंडियन एक्स्प्रेसच्या सूत्रांनुसार २०१५ पासून, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मंत्रीमंडळ सहकारी असल्याने निकटवर्तीय झाले. २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपाने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असती तर एकनाथ शिंदे हे ठाणे मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार झाले असते.

sunil tatkare and ajit pawar devendra fadnavis morning oath
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आम्ही दोन्ही…”
Basavaraj Patil
बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला फटका किती ?
What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप
mumbai shivsena corporator marathi news, one more uddhav thackeray corporator joins eknath shinde
मुंबई : ठाकरे गटाचे आणखी एक माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत

एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद देण्याचा भाजपासमोर पर्याय

गुप्तवार्ता विभागाने दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारला इशारा दिला होता. त्याबाबत स्पष्टीकरण देताना सूत्रांनी सांगितले की, “निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांच्या भाजपाच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. पण, २०१४ च्या उलट, शिवसेना आणि भाजपाने २०१९ मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली.” त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे स्वतंत्र राजकीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असताना, त्यांना उपमुख्यमंत्रिपद, सत्तेत मोठा वाटा देण्याचा पर्याय भाजपासमोर आहे. ठाणे जिल्ह्याची धुरा भाजपा पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या नेतृत्वाशी मतभेद होण्यास कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी त्यांना ठाण्यात निर्णय घेण्यास मोकळा हात देण्यास पक्षाची अनास्था होती. ठाण्यात कमकुवत असलेला भाजपा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या कामाची जाहीर कबुली देताना त्यांना प्रशासनातील मोठ्या जबाबदाऱ्या देण्यास देवेंद्र फडणवीस तयार होते. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, “सत्ताधारी असो की विरोधक, भाजपना नेहमीच गुणवत्तेवर नेत्यांचा आदर केला आहे. आम्ही एक राजकीय पक्ष आहोत आणि शिवसेनेतील मतभेद नक्कीच पुसून टाकू,” असे म्हटले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अर्धा डझन नेते विविध भ्रष्टाचाराच्या आरोपांसाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीला सामोरे जात आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांना कधीही अशा कोणत्याही धोक्याचा सामना करावा लागला नाही. उलटपक्षी, ते  त्यांच्या अनुकूल स्वभावासाठी ओळखले जातात.

एकनाथ शिंदे का संतापले?

एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाने सांगितले की, “२०१४ मध्ये शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात असताना एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते करण्यात आले. मात्र शिवसेना सरकारमध्ये सहभागी होताच त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री करण्यात आले. ते एका चांगल्या पदासाठी पात्र होते, ज्याचा उद्धव ठाकरेंनी विचार केला नाही.”

भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, “उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी जोरदार दबाव आणला असता तर पक्ष एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री बनविण्याचा विचार करू शकला असता. पण शिवसेनेने दबाव आणला नाही. शिवसेना पक्षात समांतर सत्ताकेंद्र बनतील या भीतीने कदाचित एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या सक्षम बनवायचे नव्हते.”

एकनाथ शिंदेंची शिवसेनेत घुसमट?

पाच वर्षांनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपाशी फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी आशा अनेक आमदारांना वाटत होती. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आणि नुकसान भरपाई म्हणून शिंदे यांना महत्त्वाचे नगरविकास खाते दिले, असे सूत्रांनी सांगितले. २०१४ ते २०१९ दरम्यान भाजपाला असे जाणवले होते की एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आकांक्षा जास्त आहेत आणि त्यांना शिवसेनेमध्ये गुदमरल्यासारखे वाटत आहेत, असे सूत्रांनी म्हटले आहे. २०१५ मध्ये, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी १२,००० कोटी रुपयांच्या नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गाची घोषणा केली, तेव्हा त्यांनी प्रकल्प राबवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची निवड केली.

एकनाथ शिंदे यांच्या बंडात भाजपाची भूमिका नाही, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. “एकनाथ शिंदे यांची इच्छा असल्याने आणि उद्धव ठाकरे यांना विरोध करण्यास शिवसेनेचा पाठिंबा असल्याने हे घडले. एकनाथ शिंदे यांच्यात विश्वास निर्माण करण्याचे श्रेय आम्ही (भाजपा) घेऊ शकतो. सत्ता, पद किंवा पैसा हे नेहमीच काम करत नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेते प्रतिष्ठा आणि सन्मान शोधतात, जो देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच दिला आहे,” असे भाजपा नेत्याने म्हटले आहे.