Eknath shinde On Waqf Board Notice : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळाली असून, नव्या सरकारचे ते मुख्यमंत्री आहेत. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी अजित पवार यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमधील शेतकऱ्यांना महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत मोठे भाष्य केले आहे.

आज विधानसभेच्या विशेष अधिवशेनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना लातूरमधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून आलेल्या नोटीसांबाबत विचरण्यात आले. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “हे सामान्य लोकांचे सरकार आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.”

Mumbai , Green area, sea coast , greenery,
सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Mumbai ravi raja
मुंबई : भांडवली खर्चावरून पालिकेवर आरोप, कंत्राटदारांसाठी तिजोरी खुली केल्याचा रवी राजा यांचा आरोप
Kalyan elder brother killed younger brother dispute
कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून
Three generations of 74 Panvel tribal families remain homeless
तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी
Land grabbing by Dhananjay Munde supporters Sarangi Mahajan complains to the Chief Minister Mumbai news
धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून जमीन हडप; सारंगी महाजन यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
regularization of illegal building in dombivli news in Marathi
डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा नियमानुकूलचा प्रस्ताव नगररचना विभागाने फेटाळला; याचिकाकर्त्याची प्रशासनाविरुध्द अवमान याचिकेची तयारी

काय आहे प्रकरण?

लातूर जिल्ह्यातील ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वापर केवळ धार्मिक आणि धर्मादाय कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूरच्या १०३ शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटीस पाठवली आहे. या जमिनीच्या वादात सरकारने हस्तक्षेप करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ प्राधिकरणाकडे सुनावणीसाठी गेले आहे. या प्रकरणामुळे तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

हे ही वाचा : दादांचा भाऊ म्हणून अभिमान वाटतो का? अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या….

शेतकरी काय म्हणतात?

या संपूर्ण प्रकरणावर पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शेतकरी तुकाराम कानवटे म्हणाले की, “आम्ही या जमिनीवर पिढ्यानपिढ्या शेती करत आहोत. ही वक्फ बोर्डाची मालमत्ता नाही. महाराष्ट्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. या प्रकरणात आतापर्यंत २ वेळा सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे.

हे ही वाचा : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना …

वक्फ म्हणजे काय?

अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेल्या संपत्तीला ‘वक्फ’ असे म्हटले जाते. ही संपत्ती स्थावर किंवा जंगम अशा दोन्ही स्वरूपात असू शकते. इस्लामिक कायद्याद्वारे मान्यताप्राप्त धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी कायमस्वरूपी मालमत्ता देणे म्हणजेच वक्फ. मुस्लिमांसाठी पवित्र, धार्मिक किंवा धर्मादाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते. एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते. या मालमत्तेचा वापर सामान्यत: शैक्षणिक संस्था, दफनभूमी, मशिदी आणि निवारा गृहे चालवण्यासाठी केला जातो.

Story img Loader