शिंदे गटाकडून युवेसेनेची कार्यकारिणी जाहीर; राज्यभारत नेमले नवे पदाधिकारी | shivsena eknath shinde new appointment in yuvasena across maharashtra | Loksatta

शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर; राज्यभरात नेमले नवे पदाधिकारी

शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय.

शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर; राज्यभरात नेमले नवे पदाधिकारी
एकनाथ शिंदे आणि युवासेना (संग्रहित फोटो)

शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय. हा वाद आता न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत गेला आहे. असे असताना एकनाथ शिंदे गटाने युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिंदे गटाने उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्यभरात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा >>> “…तर खपवून घेतले जाणार नाही,” टक्केवारीचा उल्लेख करत फडणवीसांनी घेतली स्पष्ट भूमिका; म्हणाले “दोन वर्षांत…”

युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी अधिक माहिती दिली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेनेत काम करणारे तरुण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत. मुंबईची जबाबदारी समाधान सरवणकर यांच्याकडे असेल. विविध विभागात वेगवेगळे तरुण काम करतील, असे पावसकर यांनी सांगितले.

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हाची लढाई न्यायालय, निवडणूक आयोगात सुरू असताना दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी मैदानावर घेण्यात येणार आहे. दोन्ही गटांनी या मेळाव्याचे टीझर, पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये आम्हीच खरी शिवसेना आहोत, याचा पुरेपूर प्रयत्न दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको, कारण…”, शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं विधान

संबंधित बातम्या

संजय राऊतांना कोर्टात बोलवून अटक होणार? कटकारस्थानाबाबत मोठा गौप्यस्फोट
“महिलांनी कपडे घातले नसले तरी…” त्या विधानानंतर बाबा रामदेव यांची माफी
राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
‘महापुरुषांची बदनामी करु नका’, राज ठाकरेंनी ठणकावल्यानंतर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “कोणीही…”
मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…”
भारतातील प्रसिद्ध रुग्णालय AIIMSचा सर्व्हर हॅक; हॅकर्सनी मागितली २०० कोटींची खंडणी
करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
सुपरस्टार चिरंजीवी यांनी चित्रपट महोत्सवात चाहत्यांना दिलं मोठं वचन; म्हणाले “मी चित्रपटसृष्टी…”