Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. कारण बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा मेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्यास कर्नाटक सरकारने विरोध केला. त्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष तापला आहे. याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. तसेच यावरून विरोधकांनी राज्य सरकारला देखील घेरलं. तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सर्व आमदारांनी आज विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच बेळगावमधील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न जिव्हाळ्याचा विषय असून महाराष्ट्र सरकार बेळगावमधील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी कर्नाटक सरकारला सुनावलं आहे.

हेही वाचा : Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“बेळगावमध्ये मराठी भाषिकांबद्दल आणि कर्नाटक-महाराष्ट्र सिमा प्रश्न जो आहे? याबाबत शिवसेनेची भूमिका ही बेळगावमधील मराठी भाषिकांबाबतची राहिलेली आहे. मराठी भाषिकांच्या पाठिमागे शिवसेना खंबीर उभी आहे. तसेच बेळगावबाबत माझी भूमिका देखील जिव्हाळ्याची आहे. कारण १९८६ साली जे आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये मी देखील बेळगावच्या तुरुंगात होतो. तसेच मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री अशी संयुक्त बैठक घेतली होती. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सिमा प्रश्न हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मराठी भाषिकांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने घ्यावी, अशा सूचना तेव्हा अमित शाह यांनी दिल्या होत्या”, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.

“मराठी भाषिकांचा मेळावा हा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला होता. मात्र, तो मेळावा होऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न कर्नाटक सरकारने केला. एक दडपशाही करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला. जे आंदोलनकर्ते होते ते माजी आमदार किंवा माजी महापौर असतील त्यांच्यासह शेकडो मराठी भाषिकांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला. त्यामुळे याचा मी निषेध करतो. महाराष्ट्र सरकारची भूमिका एकच आहे की बेळगाव मधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे उभी आहे”,असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.