शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मंगळवारी एकनाथ शिंदे हे काही सहकारी आमदारांसोबत सुरतला गेले आणि बुधवारी रात्री गुवहाटीमध्ये दाखल झाे. आपल्याकडे शिवसेनेच्या ३७ आमदारांबरोबरच अपक्ष आमदारांसहीत एकूण ४६ आमदारांचं समर्थन असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.

नक्की वाचा >> “…ही माझी लायकी नाही”; नारायण राणेंनी पवारांवर केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवारांचं उत्तर

शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. मात्र हा बंडखोरीसंदर्भातील बातम्या समोर येऊ लागल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर अनेकदा महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेआधी २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडाची आठवण झाली. या बंडाळीसंदर्भात सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असतानाच आज मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये खुद्द अजित पवारांनाच त्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात भाष्य केलं.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

नक्की वाचा >> “तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे ३६ आमदार नेले, आता कसं वाटतंय?”; मुंबईत मनसेची शिवसेनेविरोधात बॅनरबाजी

झालं असं की, एकनाथ शिंदेंनी पुकारलेलं बंड आणि त्यासंदर्भातील सल्लामसलत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर अजित पवारांनी यशंवतराव चव्हाण सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस शिंदे आणि समर्थक आमदारांकडून भाजपासोबत जाण्याची मागणी होत आहे, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोय अशा साऱ्या गोष्टींचासंदर्भ देत पत्रकार अजित पवारांना प्रश्न विचारत होते. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी थेट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या तसेच मनमोहन सिंग यांच्या सरकारची उदाहरणं दिली.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवार आणि शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्यं; म्हणाले, “अजित पवारांना…”

“२५ पक्ष घेऊन वाजपेयी यांनी सरकार चालवलं होतं. चालवलं होतं ना? त्यानंतर १० वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा त्यात किती पक्ष होते? बरेच पक्ष होतं ना?”, असे प्रतिप्रश्न उत्तर देताना अजित पवारांनी विचारले. तीन पक्षांच्या सरकारपेक्षा दोन पक्षांचं सरकार चांगलं असं तुम्ही पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर म्हणाला होता, असं पत्रकार म्हणाला. त्यानंतर, अजित पवारांनी स्वत:कडे हात करत, “कोण मी?” असा प्रश्न पत्रकाराला विचारला. त्यावर पत्रकाराने ‘होय, नोव्हेंबर २०१९ मध्ये’ असं उत्तर दिलं.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

पत्रकारने थेट देवेंद्र फडणवीसांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ दिल्यानंतर अजित पवारांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. “मी जेव्हा पहिल्यांदा शपथ घेतली होती ना, त्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर आलोच नव्हतो,” असं अजित पवार यांनी एकदम हातवारे करुन सांगितलं. ते पाहून अजित पवारांच्या बाजूला बसलेले राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासहीत सर्वच उपस्थित पत्रकार जोरजोरात हसू लागले.