एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार हे दलित आणि वंचितविरोधी असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) नेते सचिन खरात यांनी केला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना खरात यांनी महाविकास आघाडी सरकार हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या तत्वावर काम करत असल्याचं या बंडखोर शिवसेना आमदारांना पहावलं नाही, असा आरोप केला. हे बंडखोर आमदार स्वत: हिंदूत्व मानत असल्याचं आपल्याला वाटतं असंही खरात म्हणालेत. त्यांनी बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंवरही टीका केलीय.

नक्की वाचा >> “पूरग्रस्त गुवाहाटीत लोकांना अन्न मिळत नसताना बंडखोर आमदारांचा दिवसाचा जेवणाचा खर्च…”; आदित्य ठाकरेंनी सांगितला बिलाचा आकडा

ज्या वेळेस राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तसेच अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर काही कालावधीमध्ये महाराष्ट्रावर करोनाचं संकट आलं, असं खरात यांनी म्हटलंय. “हे सरकार आल्यानंतर काही कालावधीमध्येच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात करोनाची लाट पसलेली होती. त्या कालावधीमध्ये राज्य सरकार मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेलं असतानाही दादारमधील इंदू मीलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक होतंय त्याचं काम या सरकारने सुरु ठेवलं आणि ते आजही सुरु आहे,” असं खरात यांनी म्हटलंय.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
satara, bjp leader udayanraje bhosale, sharad pawar
“पक्षात असताना चूक करणाऱ्यांच्या पाठिशी आणि पक्ष सोडल्यावर…”, उदयनराजेंची शरद पवारांवर टीका
sharad pawar latest news
राजकारणात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागतं? प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “फक्त पुरुषांतच कर्तृत्व…!”

नक्की वाचा >> बंडखोर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपाची तयारी?; फडणवीसांच्या घरी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना निर्देश

पुढे बोलताना खरात यांनी, “२८ तारखेला या सरकारने महात्मा फुले महाविकास मंडळाला एक हजार कोटींचं भागभांडवल जाहीर केलं. नंतर चर्मकार विकास महामंडळाला एक हजार कोटी भागभांडवल जाहीर केलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाही एक हजार कोटी भागभांडवल जाहीर केलं. तसेच अपंगांसाठी असणारं दिव्यांग वित्त महामंडळासाठी ५०० कोटी रुपये जाहीर केलं. या साऱ्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या पोटात दुखू लागलं. त्यांना याचं वाईट वाटलं,” असा आरोप केलाय.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: संजय राऊतांचे बंधूही गुवाहाटीला जाणार? सुनील राऊत म्हणाले, “माझ्यासाठी आमदारकी…”

“हे सरकार शाहू, फुले, आंबेडकरांबरोबरच रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि आहिल्याबाई होळकरांच्या यांच्या विचाराने का चालतंय? गोळवलकर गुरुजी, हेगडेवार यांच्या विचाराने का चालत नाही? असं त्यांना वाटलं. माझा स्पष्ट आरोप आहे हे हिंदूत्वसुद्धा मानत नाहीत. हिंदूत्व मानत असते तर ते मुफ्तींबरोबर का गेले?,” असा प्रश्न खरात यांनी उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> “महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची…”, भाजपाला लक्ष्य करत शिवसेनेचा हल्लाबोल; “लाज असती तर…” म्हणत बंडखोरांवर टीका

“देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ शिंदे म्हणत होते की राजीनामा माझ्या खिशात आहे. त्यामुळे हे साफ खोटं बोलतात. माझा आरोप आहे की हे बंडखोर आमदार दलितविरोधी आणि वंचितविरोधी आहेत,” असंही खरात यांनी म्हटलंय.