महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात पुकारलेलं बंड आणि त्यानंतर राज्यात झालेलं सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद अगदी न्यायलयापासून विधानसभेपर्यंत सर्वच ठिकाणी सुरु आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील खटला ते आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूने झाडल्या जात असतानाच ४० आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतरही न्यायलयीन लाढाई आणि आरोप प्रत्यारोप सुरु असून याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सत्तासंघर्षामध्ये त्यांच्या पाठिशी असणाऱ्या शिवसेनेच्या १५ आमदारांना एक विशेष पत्र पाठवलं आहे.

नक्की वाचा >> २०० आमदार निवडून आणण्याच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, “मला वाटतं त्यांचं चुकलं काहीतरी, आपली…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेसोबत असणारे आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे आमदार रविंद्र वायकर यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंनी पाठवलेलं हे पत्र शेअर केलं आहे. या पत्रामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण करुन देत शिवसेनेसोबत राहिल्याबद्दल आमदारांचे आभार मानतानाच कोणत्याही प्रलोभनांना आणि धमक्यांना बळी न पडल्याबद्दल त्यांचं कौतुक केलंय. वायकरांना पाठवलेल्या या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात…

प्रिय शिवसेना आमदार श्री, रविंद्र दत्ताराम वायकर

शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबातचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेबा ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले.

आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.

नक्की वाचा >> नागपूरमधील फडणवीसांच्या बॅनर्सवरुन अमित शाहांचे फोटो गायब; शरद पवारांना विचारलं असता म्हणाले, “त्याच्यात कोणाचा फोटो…”

नक्की वाचा >> “…तेव्हा लाज वाटली नव्हती का?”; शिंदे गटाचा ठाकरेंना रोखठोक सवाल

हे पत्र ६ जुलै रोजी पाठवण्यात आलं असलं तरी ते वायकर यांनी आज म्हणजेच ११ जुलै रोजी ट्विटरवरुन शेअर केलं आहे. दरम्यान, एकीकडे सत्तासंघर्ष सुरु असतानाच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसारख्या उपनगरांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने स्थानिक स्थरावरही पक्षाची विस्कटलेली घडी नीट बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंना चांगलाच संघर्ष करावा लागण्याची चिन्हं दिसत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde revolt shivsena chief uddhav thackeray thanks those mla who supports him scsg
First published on: 11-07-2022 at 12:50 IST