मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवरील कारवाईचं समर्थक केलं आहे. “पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे,” असं मत व्यक्त केलं. ते बुधवारी (२८ सप्टेंबर) नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे. अशा घोषणा देणाऱ्यांना या देशात राहण्याचाच अधिकार नाही. त्यामुळे पीएफआयवर जी बंदी घातली ती योग्य आहे.”

“या राज्यात, देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं खपवून घेतलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

हेही वाचा : विश्लेषण : शिंदे वि. ठाकरे… निवडणूक आयोगापुढील सुनावणीत काय होणार?

“केंद्राचा आणि राज्याचा गृहविभाग दोघांचंही यावर बारीक लक्ष आहे. या देशात राष्ट्रद्रोही, देशद्रोही विचार कुणालाही पसरवता येणार नाही आणि पसरवू दिले जाणार नाहीत,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde say those who slogan pakistan jindabad have no right to stay in india pbs
First published on: 28-09-2022 at 10:55 IST