scorecardresearch

Premium

मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळांच्या भूमिकेचं मुख्यमंत्री शिंदेंकडून समर्थन; म्हणाले, “जुन्या कुणबी नोंदींची…”

ज्या मराठा कुटुंबांकडे जुन्या कुणबी नोंदी आहेत, अशा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे.

eknath shinde chhagan bhujbal
मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष चालू आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार ज्या मराठा कुटुंबांकडे जुन्या कुणबी नोंदी आहेत, अशा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध केला आहे. तसेच त्यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर आरक्षणाच्या विषयावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाद चालू आहे. या सर्व गोष्टींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांचा विरोध नाही. मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर कुठल्याही प्रकारच्या अन्याय केला जाणार नाही. यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मागासवर्ग आयोगही त्यावर काम करतोय.

Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
bhagwant maan
पंजाबचे मुख्यमंत्री नव्या भूमिकेत; केंद्र आणि शेतकऱ्यांच्या चर्चेत मध्यस्थ म्हणून भगवंत मान यांची महत्त्वपूर्ण भूमिका
study group report recommended many benefits for maharashtra loom owners zws 70
राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रलंबित मागण्यांना अभ्यास समितीनकडून न्याय; अनेक चांगल्या शिफारशी 
chitra wagh reply to ubt leader sushma andhare
“विरोधकांनी शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” चित्रा वाघ यांनी सुनावले; म्हणाल्या, “त्यांना केवळ देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा…”

कुणबी जातप्रमाणपत्रास होत असलेल्या विरोधावर एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना आपण काढलेली नाही. ही अधिसूचना १९६७ साली काढण्यात आली होती. तेव्हापासून तिचा अवलंब केला जात आहे. छगन भुजबळांची एवढीच मागणी आहे की, ओबीसींचं आरक्षण कमी होऊ नये. हीच भूमिका सरकारचीदेखील आहे.

हे ही वाचा >> “शिंदे समिती बरखास्त करा!”, छगन भुजबळांच्या मागणीवर जरांगे संतापले; म्हणाले, “सत्य बाहेर…”

भूजबळांची मागणी काय?

हिंगोली येथे रविवारी (२६ नोव्हेंबर) ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने गठीत केलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती तत्काळ रद्द करा आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यावर ताबडतोब स्थगिती द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी एल्गार सभेतून केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde says chhagan bhujbal and maharashtra govt shares same views on maratha reservation asc

First published on: 27-11-2023 at 18:56 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×