scorecardresearch

Premium

“…म्हणून आमचा निर्णय योग्य ठरला”, पाटण्यातील बैठकीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

बिहारच्या पाटणा येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका.

Eknath Shinde Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे

देशातील १५ विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटण्यात बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षांनी दिलों का गठबंधन असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून हे सर्व पक्ष एकत्र आले. या बैठकीवर आता भारतीय जनता पार्टी आणि एनडीएकडून टीका सुरू आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने या बैठकीवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या लोकांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध केला, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना विरोध केला, तुम्ही (उद्धव ठाकरे) काल त्यांच्याबरोबर जाऊन बसलात. त्यांच्याबरोबर दिलों का गठबंधन केलंत. म्हणूनच एक वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला तो कसा योग्य होता याची खातरजमा या पाटण्याच्या बैठकीनंतर झाली आहे.

rashmi shukla dgp maharashtra
रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती; फोन टॅपिंगबाबतचे गुन्हे रद्द झाल्यानंतरची मोठी अपडेट!
chagan bhujbal
विकासकामांना स्थगिती प्रकरण: भुजबळ यांच्याकडून याचिका मागे
Chandrashekhar Bawankule (1)
पत्रकारांना सांभाळण्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्यावरून वाद
Chandrashekhar Bawankule (2)
“पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी…”, भाजपा पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सल्ल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धवजी सतत भाजपावर आरोप करायचे. मेहबुबा मुफ्तींबरोबर सरकार स्थापन केलं असं म्हणायचे. मग काल तुम्ही काय केलं. तुम्ही मुफ्तींबरोबर बसलात, गप्पा मारल्या. काल तुम्ही चारा घोटाळ्यातले आरोपी लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर बसलात. आता मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात हे लोक आंदोलन करणार आहेत. पण कुठल्या तोंडाने तुम्ही हे आंदोलन करणार आहात. या भ्रष्टाचाऱ्यांबरोबर तुमचं साटंलोटं पाहायला मिळालं.

हे ही वाचा >> “परिवारावर आलात तर…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले, “मातोश्री बंगल्यावर जाऊन…”

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात हे १५ पक्ष एकत्र आले. परंतु या सर्वांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर नैराश्य स्पष्ट दिसत होतं. परंतु मोदींविरोधात या लोकानी एकत्र येणं हा मोदीजींचा विजय आहे. ही मोदीजींची जीत आणि त्यांची हार आहे. अशा किती आघाड्या केल्या, किती विरोधक एकत्र आले, आरोप केले तरी जनतेनं यांच्यातल्या एकालाही ४० पेक्षा जास्त खासदार दिले नाहीत. विरोधी पक्षनेता बनवण्याइतके खासदारही यांच्याकडे नाहीत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde slams uddhav thackeray for meeting mehbooba mufti lalu prasad yadav asc

First published on: 24-06-2023 at 17:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×