काँग्रेस नेते आणि वायनाडचे (केरळ) माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हे पक्ष राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली आहे. ठाण्यातही ही यात्रा काढण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. या यात्रेच्या समारोपावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. सावरकर हे देशभक्त होते, राष्ट्रभक्त होते, प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे. पूर्वी लोक हिंदुत्व हा शब्द उच्चारायला कचरत होते. परंतु २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे हिंदुत्वाचा मान सन्मान जागा झाला.

Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप
Sanjay Mandlik
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया; हसन मुश्रीफ यांचे आवाहन

शिंदे म्हणाले की, जाणीवपूर्वक हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काही लोक करत आहेत. सावरकरांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातला हिंदू आता जागा झाला आहे, जागरुक झाला आहे आणि तो आता सक्रीय झाला आहे. पण काही लोक त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्याना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे.

हे ही वाचा >> “गीदड की खाल…”, साईबाबांवरील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “त्यांना ईश्वराचं स्थान…”

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

शिंदे म्हणाले की, सावरकरांचा अपमान केल्यामुळे मणिशंकर अय्यर यांना जोडे मारणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा वरसा सांगणारे लोक आता राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला त्यांच्यासोबत बसण्याचं पाप काही लोक करत आहेत, हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. परंतु आम्ही मात्र सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही. या सरकारमधली कोणतीही व्यक्ती ते खपवून घेणार नाही.