Eknath shinde Visits Kamakhya Devi Temple : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज गुवाहाटी जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा गुवाहाटी दौरा आहे. या दौऱ्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनीही उधाण आलं आहे.

सत्ता स्थापनेनंतर आमदारांसह घेतलं होतं कामाख्या देवीचं दर्शन

एकनाथ शिंदे अडीच वर्षांपूर्वी शिवेसेनेतून बंडखोरी करत वेगळी चूल मांडली होती. त्यावेळी सर्व आमदारांना घेऊन ते गुहावाटीला गेले होते. त्यानंतर भाजपाच्या मदतीने त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्तास्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटी जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी जात कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे.

Maharashtra CM Eknath Shinde Property Net Worth Income in Marathi
CM Eknath Shinde Property: एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ, १३ कोटींवरून थेट ३७ कोटींपर्यंत पडली भर!
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

गुवाहाटी पोहोचताच एकनाथ शिंदेंनी साधला माध्यमांशी संवाद

गुवाहाटी पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आम्ही कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला आलो असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादीही लवकरच जाहीर होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा- Maharashtra News : “पुढच्या काही तासांतच महाविकास आघाडी तुटल्याचे दिसेल”, रामदास कदमांचा मोठा दावा

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

दरम्यान, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने काल ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मया यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री तसेच बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. शिंदे गटाने मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून, तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून विधानसभेचं तिकीट दिलं. याशिवाय अभिजित अडसूळ यांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमधून, तर यामिनी जाधव यांना भायखळा आणि मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्वेतून उमेदवारी दिली.

Story img Loader