Maharashtra CM Oath Ceremony Updates : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झालं असतान उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वीकारणार की नाही याबाबत साशंकता आहे. शिंदेसनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा आग्रह केला आहे. त्याकरता सर्व आमदारांनी काल (४ डिसेंबर) एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. त्यामुळे आमचा आग्रह एकनाथ शिंदे स्वीकारतील अशी खात्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. आज त्यांनी पत्रकार परिषदेत हा विश्वास व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, मी नाराज नसून सत्तास्थापनेत माझा कोणताही अडसर नसेल अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली होती. तसंच, महत्त्वाची खाती मिळावीत म्हणून एकनाथ शिंदे आग्रही आहेत. महत्त्वाची खाती मिळणार असतील तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं जाईल, अशी अटही एकनाथ शिंदेंनी ठेवल्याचं वृत्त होतं. परंतु, या चर्चा खोट्या असल्याचं उदय सामंत म्हणाले.

dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Rahul Gandhi in veer Savarkar defamation case
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!

हेही वाचा >> Maharashtra CM Swearing Ceremony Live : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी? शिंदेसेनेचे आमदार म्हणाले, “मोदी आणि शाहांच्या…”

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील

उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर झालेलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घ्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल, याची खात्री आहे. आम्ही ५९ आमदारांपैकी कोणीही उपमुख्यमंत्री हण्यास इच्छूक नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. मनातदेखील विचार केलेला नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत, आणि तेच उपमुख्यमंत्री होतील”, अस विश्वास त्यांनी व्यक्त केला. “

“या सर्व गोष्टींना पूर्णविराम देणं गरेजचं आहे. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर आम्हीदेखील आमच्यावर कोणती जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आम्ही सांगितली”, असंही उदय सामंत म्हणाले.

एकनाथ शिंदेंना डावलून कुणी काही करणार असेल तर…

शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही आणि त्यांनी ते शिवसेनेच्या इतर नेत्याला दिले तरी आम्ही ते स्वीकारणार नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे. शिवसेनेकडून कुणाचीही नावे आता माध्यमात येऊ नयेत, अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या कुणाच्याही मनात या खुर्चीवर बसण्याचा विचार नाही. हा खुलासा करणेही आमच्यासाठी दुर्दैव आहे. एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत. आमच्या सर्वांचे राजकीय भवितव्य त्यांच्या हातात दिले आहे. त्यांना डावलून कुणी काही करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.”

Story img Loader