लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : शहरात दत्त नगरातील माकपच्या कार्यालयात एका ८० वर्षांच्या वृध्द कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे निश्चित कारण लगेचच स्पष्ट झाले नाही. अल्लाउद्दीन बाबूलाल शेख (रा. गांधीनगर झोपडपट्टी, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास माकप कार्यालयातील एका खोलीत हा प्रकार उजेडात आला.

BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा

रे नगर योजनेंतर्गत संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या ३० हजार असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांच्या चाव्या प्रदान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्याच्या पार्श्वभूमीवर या महत्वाकांक्षी गृह प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे सार्वत्रिक चर्चेत आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखालील पक्षाच्या कार्यालयात वृध्द कार्यकर्त्याने आत्महत्या करण्याचे कारण काय, याचा तपास जेलरोड पोलीस करीत आहेत.

आणखी वाचा-मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना निघाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल रात्रीपर्यंत…”

माकपच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अल्लाउद्दीन शेख हे ४० वर्षांपूर्वी माकपचे सदस्य झाले होते. १९८५ साली सोलापूर महापालिका निवडणुकीत पक्षाने एका प्रभागातून त्यांना उमेदवारीही दिली होती. पक्षाच्या प्रत्येक लढ्यात झोपडपट्टीवासी, श्रमिकांच्या न्याय हक्काच्या लढ्यात त्यांचा सहभाग असे. परंतु नंतर पक्षाच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण न केल्यामुळे त्यांचे पक्षाचे सदस्यत्व संपुष्टात आले होते. नंतर ते काँग्रेस, जनता दल अशा अन्य पक्षात गेले तरी त्यांचा माकप पक्षाच्या कार्यालयासह नरसय्या आडम यांच्याशी संपर्क होता. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात येऊन आडम यांना भेटले. दरम्यान, आपल्या एका नातलगाचे निधन झाल्यामुळे आडम हे कार्यालयातून बाहेर पडले. कार्यालयात नेहमीप्रमाणे कार्यकर्ते व कामगारांची वर्दळ सुरू असताना अल्लाउद्दीन शेख यांनी एका खोलीत गळफास घेतल्याचे आढळून आले.