scorecardresearch

वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या ; कर्ज, नापिकीमुळे टोकाचे पाऊल 

शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे डामरे कुटुंबाला दिवसेंदिवस अवघड होत चालले होते.

वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या ; कर्ज, नापिकीमुळे टोकाचे पाऊल 
वसंत डामरे (७०) आणि सरला डामरे (६५) असे या दाम्पत्याचे नाव आहे

बुलडाणा : नापिकीमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. वसंत डामरे (७०) आणि सरला डामरे (६५) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

नांदुरा तालुक्यातील बेलुरा येथील डामरे कुटुंबाकडे दोन एकर जमीन आहे. शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे डामरे कुटुंबाला दिवसेंदिवस अवघड होत चालले होते. त्यात कर्जाची परतफेड कशी करणार, याची चिंताही त्यांना सतावत होती. याच चिंतेतून डामरे दाम्पत्याने जहाल विष प्राशन केले. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  शेतीची जोखीम कमी करू, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न साधने निर्माण करू, शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज देऊ, शेतकऱ्यांना मिळकतीची साधने उपलब्ध करू, अशा घोषणा सरकारकडून सतत केल्या जात असल्या तरी वास्तव यापेक्षा अगदी उलट असल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 05:21 IST

संबंधित बातम्या