Suspicion of Carrying Beef in Nashik: गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हरियाणामध्ये पश्चिम बंगालमधील एका मजुराचे मॉब लिंचिंग झाल्याची घटना घडली असताना महाराष्ट्रात नाशिकमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका ट्रेनमध्ये तरूणांचा एक घोळका गोमांस बाळगल्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ७२ वर्षीय वृद्ध गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यामुळे सहप्रवाशांनी वृद्धाला मारहाण केली, ही घटना २८ ऑगस्टला घडली. या प्रकरणाची दखल एमआयएम पक्षाचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही घेतली असून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबईहून सुटणाऱ्या धुळे – सीएमएमटी एक्सप्रेसमध्ये २८ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला. जळगावमध्ये राहणारा वृद्ध प्रवाशी कल्याणमध्ये आपल्या मुलीकडे जायला निघाला होता. नाशिक रेल्वे स्थानक गेल्यानंतर वृद्धाचा बसण्याच्या जागेवरून काही तरूणांशी वाद झाला. यानंतर तरुणांनी वृद्धाकडे गोमांस असल्याचा संशय व्यक्त करून त्याच्या सामानाची तपासणी केली. यावेळी आपण म्हशीचे मांस घेऊन जात असल्याचे वृद्धाने सांगितल्यानंतर त्याला टोळक्याने मारहाण केली. यावेळी काही तरूणांनी या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले, जे आता व्हायरल होत आहे.

Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: गायीच्या तस्करीच्या संशयावरून गोरक्षकांनी केली १२वी च्या विद्यार्थ्याची हत्या; ३० किमीपर्यंत केला पाठलाग
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar X
Mahyuti Disruption : तानाजी सावंतांपाठोपाठ भाजपा नेत्याची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “त्यांच्यामुळे आमचं वाटोळं…”, महायुतीत धुसफूस चालूच
Sangli, Sanjaykaka Patil, Legislative Assembly,
सांगली : एका पराभवाने खचणारा मी नाही! संजयकाका पाटील यांचे विधानसभेसाठी सुतोवाच
Satara, Water storage, Koyna, Dhome,
सातारा : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने जारी केला नवा जीआर; सुधारित शासन निर्णयातून कोणती घोषणा?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?

हे वाचा >> Crime News : गोमांस खाल्ल्याच्या संशयावरुन मजुराची मारहाण करुन हत्या, गोरक्षा समितीच्या पाच सदस्यांना अटक

मारहाण करणाऱ्या आरोपींनी वृद्ध व्यक्तीला कल्याण स्थानकातही उतरू दिले नाही. ठाण्यात तरुणांचा घोळका उतरल्यानंतर वृद्ध ठाण्यावरून पुन्हा कल्याणला परतला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि वृद्ध व्यक्तीचा माग काढून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांचे पथक जेव्हा वृद्धाच्या घरी पोहोचले तेव्हा ते गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी एफआयआर नोंदविला.

मुंबई रेल्वे पोलिसांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन ते तीन तरुण धुळे जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यांना ताब्यात घेऊन ठाणे येथे आणण्यात आले आहे. त्यांचा या घटनेत सहभाग किती होता? याचा तपास केला जात आहे. म्हशीच्या मांसावर बंदी नसल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे.

nashik beef carry tweet
माजी खासदार इम्तियाज जलील यांची एक्स वरील पोस्ट

आम्ही मूक साक्षीदार होणार नाही

दरम्यान एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी एक्सवर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. हे असे प्रसंग आता सामान्य वाटावेत, इतक्या घटना घडत आहेत. त्यामुळे अशा घटनांचा आम्ही ताकदीने विरोध करू. आम्ही मूक साक्षीदार होऊ शकत नाहीत. आता वेळ आली आहे की, धर्मनिरपेक्ष भारतीयांनी एकत्र येऊन या माजोरड्या शक्तींविरोधात आवाज उचलायला हवा. या तरुणांमध्ये इतके विष कसे काय भिनले. आजोबांच्या वयाच्या व्यक्तीशी असे वागण्याचा विचार हे तरुण कसे काय करू शकतात? असा प्रश्न मला पडतो.