कर्जत : कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला. आ. पवार यांच्या एकहाती नेतृत्वाने राष्ट्रवादी व काँग्रेसने नगरपंचायतीत सत्तांतर घडवले. १७ पैकी १५ (पैकी राष्ट्रवादी १२) जागा या दोन्ही पक्षांनी जिंकल्या. भाजपला अवघ्या २ जागा मिळाल्या.  कर्जत नगरपंचायतीत १७ जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादीने बिनविरोध मिळवली होती. बुधवारी सर्व १६ जागांसाठी मतमोजणी झाली. त्याद्वारे राष्ट्रवादीने भाजपच्या हातून नगरपंचायतची सत्ता खेचून घेतली. ही निवडणूक राज्यात चांगलीच गाजली. माजी मंत्री शिंदे यांनी आमदार पवारांवर दहशत, दडपशाहीचा आरोप केला होता. परंतु  निकाल पाहता त्याचा मतदारांवर परिणाम झाला नाही.

निवडणुकीचा निकाल

bjp candidate first list for lok sabha election likely to announce today
भाजपची पहिली यादी आज? केंद्रीय निवडणूक समितीच्या मेगाबैठकीत विचारमंथन सुरूच
मोहिते-पाटीलविरोधक उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
Himachal Pradesh Speaker disqualifies 6 Congress MLAs
हिमाचलमध्ये राजकीय उलथापालथ चालूच! काँग्रेसचे ‘ते’ सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; कारण काय?
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका

प्रभाग १- ज्योती लालासाहेब शेळके (राष्ट्रवादी, ४६१, विजयी), वंदना भाऊसाहेब वाघमारे (भाजप १९३). प्रभाग २- लंकाबाई देविदास खरात (राष्ट्रवादी, बिनविरोध). प्रभाग ३- संतोष मेहेत्रे (राष्ट्रवादी ५५४, विजयी), रावसाहेब खराडे (भाजप ३५२). प्रभाग ४- अश्विनी गजानन दळवी (४३९, भाजप, विजयी), मनीषा सचिन सोनमाळी (राष्ट्रवादी, २७२ ). प्रभाग ५ – रोहिणी सचिन घुले (काँग्रेस ४७४ विजयी), सारिका गणेश शिरसागर (१४२). प्रभाग ६- मोनाली ओंकार तोटे (काँग्रेस २२५, विजयी), गणेश शिरसागर (भाजपा, २११). प्रभाग ७-सतीश पाटील (राष्ट्रवादी, ३२३, विजयी),  दादासाहेब सोनमाळी (भाजप २८९). प्रभाग ८- भाऊसाहेब तोरडमल (काँग्रेस ४९९ विजयी), बबन लाढाणे (भाजप, ११४). प्रभाग ९- अमृत काळदाते (राष्ट्रवादी ३५५, विजयी), उमेश जपे (१५७, भाजप). प्रभाग १० – उषा अक्षय राऊत (राष्ट्रवादी ६४४, विजयी), मोनिका अनिल गदादे (भाजपा ११४). प्रभाग  ११- मोहिनी दत्तात्रय पिसाळ (भाजप, २९८, विजयी), ऐश्वर्या विजय नेटके (राष्ट्रवादी, २६१). प्रभाग १२ – नामदेव राऊत (राष्ट्रवादी- ६४८ विजयी), शरद  म्हेत्रे (भाजप, ३२५). प्रभाग १३ – सुवर्णा रवींद्र सुपेकर (राष्ट्रवादी, ३२७  विजयी), वनिता परशुराम शिंदे (भाजप २३९). प्रभाग १४ – ताराबाई सुरेश कुलथे (राष्ट्रवादी ३३२, विजयी), शिबा तारेक सय्यद (भाजप, ११). प्रभाग १४ – भास्कर भैलुमे (राष्ट्रवादी ४६४ विजयी), संजय भैलुमे (भाजप २७३). प्रभाग १६-  प्रतिभा नंदकिशोर भैलुमे (राष्ट्रवादी ३६३ विजयी), सुवर्णा विशाल काकडे (भाजप १९२). प्रभाग १७- छाया सुनील शेलार (राष्ट्रवादी ७२६, विजयी), अनिल मारुती गदादे (भाजप, ४९६).

सासरा आणि सून दोघेही विजयी

विद्यमान नगराध्यक्ष नामदेव राऊत व त्यांच्या सून उषा अक्षय राऊत हे दोघे पुन्हा विजयी झाले. विजयाची परंपरा त्यांनीदेखील कायम राखली. प्रभाग १०  मधून राष्ट्रवादीच्या उषा राऊत सर्वाधिक ५३० मतांनी विजय झाल्या.

सतीश पाटील जायंट किलर

 राष्ट्रवादीचे प्रभाग ७ चे उमेदवार सतीश उद्धवराव पाटील या निवडणुकीत जायंट किलर ठरले. त्यांनी भाजपचे दादासाहेब सोनमाळी यांचा पराभव केला. या प्रभागाच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सतीश पाटील यांनी प्रथमच निवडणूक लढवली. आ. पवार, माजी नगराध्यक्ष राऊत व प्रतिभा भैलुमे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे या सर्वाच्या नियोजनाला मुळे पाटील यांनी सोनमाळीस यांच्यावर मात केली.