कर्जत : कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला. आ. पवार यांच्या एकहाती नेतृत्वाने राष्ट्रवादी व काँग्रेसने नगरपंचायतीत सत्तांतर घडवले. १७ पैकी १५ (पैकी राष्ट्रवादी १२) जागा या दोन्ही पक्षांनी जिंकल्या. भाजपला अवघ्या २ जागा मिळाल्या.  कर्जत नगरपंचायतीत १७ जागांसाठी निवडणूक झाली. यातील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादीने बिनविरोध मिळवली होती. बुधवारी सर्व १६ जागांसाठी मतमोजणी झाली. त्याद्वारे राष्ट्रवादीने भाजपच्या हातून नगरपंचायतची सत्ता खेचून घेतली. ही निवडणूक राज्यात चांगलीच गाजली. माजी मंत्री शिंदे यांनी आमदार पवारांवर दहशत, दडपशाहीचा आरोप केला होता. परंतु  निकाल पाहता त्याचा मतदारांवर परिणाम झाला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणुकीचा निकाल

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election independence nagar panchayat power ncp ysh
First published on: 20-01-2022 at 02:40 IST