करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून देशभरात टाळेबंदी आहे. या टाळेबंदीतून देशातले व्याघ्र प्रकल्पही सुटलेले नाहीत. ताडोबा अंधारी व्यग्र प्रकल्प ३१ मार्चपासून पूर्णतः बंद आहे. या टाळेबंदीच्या काळातच सुशीला नावाच्या हत्तिणीने एका गोंडस पिल्लाला जन्म दिला. टाळेबंदी असूनही ताडोबा वन व्यवस्थापनाने नव्या पाहुण्याचे स्वागत केलं आहे. एन. आर. प्रवीण यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्प ३ मे पर्यंत बंदच आहेत. टाळेबंदीमुळे  मार्चपासून व्याघ्र प्रकल्प बंद झाल्याने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत पर्यटकांना व्याघ्र सफारीला मुकावे लागले आहे. त्यामुळे निसर्ग व व्याघ्रप्रेमींचा हिरमोड झाला आहे. यावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांनी तोडगा शोधून काढला आहे. टाळेबंदीतही वन्यजीवप्रेमींना व्याघ्र भ्रमंतीचा आनंद मिळावा यासाठी असे ऑनलाइन व्याघ्र दर्शन सुरू केले आहे.