scorecardresearch

उद्यापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार! शिक्षण विभागाची माहिती

अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

उद्यापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार! शिक्षण विभागाची माहिती
११ प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. यापुर्वी अकरावीची सीईटी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्ययालयाने दिला होता. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले होते. दरम्यान, दरम्यान अकरावी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. ११ प्रवेश प्रक्रियेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रमांक देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

कशी असेल प्रक्रिया?

उद्यापासून अकारावी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.  राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. उद्यापासून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग १ भरायचा आहे. तर १७ ते २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग २ भरावा लागणार आहे. २५ ऑगस्टला या संदर्भातील पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर जे पसंती क्रमांक मिळाले आहेत त्यानुसार २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत कॉलेज मिळालं आहे हे कळेल.

त्यानंतर २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना आपले कॉलेज निश्चित करायचे आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेज पसंत नसेल तर ३० ऑगस्टला संध्याकाळी १० वाजता रीक्त जागांबाबत संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या गुणवत्ता यादीबाबब हे वेळापत्र जाहीर करण्यात आलं आहे. काही दिवसांनतर दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यापुढचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.