एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणात माओवादी आणि अर्बन नक्षलवादा उल्लेख करणाऱ्या मोदी सरकारला शरद पवार यांनी टोला लगावला. एल्गार परिषद आणि कोरेगावमध्ये झालेल्या भाषणात नेत्यांनी केवळ अन्यायावर भाष्य केलं होतं. अन्याय, अत्याचार भाष्य करणं चुकीचं नाही. मात्र, त्याविषयी बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही. नामदेव ढसाळ यांनी त्याच्या कवितेमधून अन्याय भाष्य करता आग लावण्याचं मत मांडलेलं आहे. याचा अर्थ लगेच आग लावणार असा होत नाही,” अशा शब्दात पवार यांनी मोदी सरकारचे कान टोचले.

शरद पवार यांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर या प्रकरणानं नवं वळण घेतलं. राज्य सरकारकडून एसआयटी नेमण्यासंदर्भात हालचाली सुरू होण्याच्या हालचाली सुरू होताच केंद्र सरकारनं तातडीनं हे प्रकरण एनआयएकडे सुपूर्द केलं. त्यावर शरद पवार यांनी टीका केली. सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले,”केंद्र सरकारचं कृत्य संशयास्पद आहे. सत्या बाहेर येण्याच्या भीतीनं तपास एनआयएकडे सोपवला. राज्य सरकारकडून तपास काढून घेणं चुकीचं आहे. केंद्राला अधिकार आहे. पण केंद्रानं तसं गाजवायचं नसतं. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारकडे असते. त्यामुळे राज्य सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये. पोलीस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवलं नाही. याच्या तपासाची गरज आहे. पोलीस अधिकारी कसे वागले. त्याचा तपास राज्य सरकारने करावा. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही, असा संदेश जाणं गरजेच आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची वेगळी चौकशी सरकारनं करावी,” अशी मागणी शरद पवार यांनी केली.

आणखी वाचा – सत्य बाहेर येईल म्हणून ‘एनआयए’कडे तपास दिला; शरद पवारांचा केंद्रावर गंभीर आरोप

नामदेव ढसाळांची कविता आणि आग लावण्याची भाषा-

नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा संदर्भ देत शरद पवार यांनी एल्गार परिषदेत अन्याय, अत्याचाराविषयी करण्यात आलेल्या भाषणांचं समर्थन केलं आहे. पवार म्हणाले,”महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचारविषयी नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेतून संताप व्यक्त केलेला आहे. हे किती सहन करायचं, असं म्हणत त्यांनी कवितेतून आग लावण्याची भाषा केलेली आहे. त्यांच्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र सरकारनं पुरस्कार दिलेला आहे. केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. मग, त्यांच्या कवितेचा अर्थ लगेच आग लावायची असा होत नाही. अन्यायाविषयी बोलण्याचं, विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्याविषयी बोललं म्हणजे नक्षलवादी होत नाही,” असं पवार यावेळी म्हणाले.