प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर :  पोलीस भरतीसाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात तरुणांची जोरदार तयारी सुरू आहे. हजारो तरुण यासाठी पहाटेपासूनच व्यायामाचा सराव करताना दिसून येतात. मात्र व्यायामाचा उत्साह येण्यासाठी या तरुणांमध्ये ऊर्जा वाढविणाऱ्या (एनर्जी ड्रिंक) घेण्याचे प्रमाण वाढत असून, त्याचे अनेक दुष्परिणाम कालांतराने भोगावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Gold Silver Price on 15 April 2024
Gold-Silver Price on 15 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना फुटला घाम, १० ग्रॅमचा दर ऐकून व्हाल थक्क
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

खेळाडूंमध्ये ‘स्टिरॉइड्स’च्या वापराचे प्रमाण वाढते आहे. शरीरसौष्ठवपटूही बाजारात उपलब्ध असणारे उपाय करत असतात, जे शरीराला घातक असल्याचे नंतर कळते. त्याच पद्धतीने स्पर्धामध्ये सहभागी होणारे तरुण ‘एनर्जी ड्रिंक’च्या आहारी जात असल्याचे आढळत आहे. एका कंपनीच्या ‘एनर्जी ड्रिंक’च्या २५० मिलीच्या बाटलीची किंमत ११० ते १२० रुपये आहे. तर, भारतीय बनावटीचे ‘एनर्जी ड्रिंक’ बाजारपेठेत केवळ वीस ते पंचवीस रुपयांत २५० मिली उपलब्ध असते. वास्तविक हे लहान मुलांनी, महिलांनी, गरोदर स्त्रियांनी वापरू नये, ते अपायकारक आहे, असे त्यावर लिहिलेले असते. तरीही औषधांची दुकाने, किराणा दुकानात सर्रास विकले जाते. २५० मिलीच्या बाटलीत वीस चमचे साखर व  दहा कप कॉफीमध्ये असणारे कॅफेन असते. हे शरीराला धोकादायक आहे. हृदय , फुप्फुस, मूत्रिपड,मेंदू अशा  अवयवांवरती याचे दुष्परिणाम होतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.         

व्यायामशाळेत जाणाऱ्या तरुणांनी एक कप ‘ब्लॅक कॉफी’ घेतली तर चालते, मात्र त्याच्या दसपट कॅफिन असणारी  पेये घेतली जातात व ती शरीराला   अपायकारक आहेत, असे आहारतज्ज्ञ डॉ. नितीन लहाने यांनी सांगितले.

* उत्तेजना यावी यासाठी तरुण अशा पेयाकडे मोठय़ा प्रमाणावर वळत आहेत. त्याचा तात्पुरता लाभ होतो. असे पेय घेणाऱ्या तरुणाला तरतरी येते व तो इतरांपेक्षा अधिक वेगाने धावतो, हे खरे आहे. मात्र सर्वच तरुणांवर त्याचा समान परिणाम होतो असे नाही . प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते. काहींचे हृदयाचे ठोके वाढतात, काहींचा रक्तदाब वाढतो असे त्याचे  दुष्परिणामही आहेत. तरुणाईमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे एक कारण अशाप्रकारची कृत्रिम पेये असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.  अशी पेये बाजारपेठेत सरसकट कशी काय उपलब्ध होतात? यावर कोणाचेच बंधन नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.