सोलापूर : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे उत्साही वातावरणात स्वागत करताना शाळांच्या परिसरात उत्साह पाहायला मिळाला. सुंदर व आकर्षक रांगोळ्यांसह पुष्पपर्णांची सजावट, रंगरंगोटीने बहुसंख्य शाळा सजल्या होत्या.

शाळेच्या पहिल्या दिवसाची घंटा वाजताच आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब फुले आणि मिठाई, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांची घोड्यांच्या बग्गीमध्ये बसवून परिसरात शोभायात्रा काढली, तर काही शाळांनी ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, जलदिंडीसारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.

Raju Shetti On MahaVikas Aaghadi
“सर्वांनी मिळून शेवटी…”; राजू शेट्टींचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “विश्वासघात…”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Sangli, loot,
सांगली : पोलीस असल्याची बतावणी करत सोन्याचे दागिने लंपास
Sangli, Shivsena, protests,
सांगली : रिक्षा नुतनीकरणास प्रतिदिन ५० रुपये विलंब आकारणीच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
UddhavThackeray
भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”
Bajrang Sonwane On Dhananjay Munde
“जनतेनं त्यांना माझी पात्रता दाखवली”, बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंना इशारा; म्हणाले, “विधानसभेला आणखी एक विकेट…”

हेही वाचा – सांगली : कॉंग्रेसच्या एकजुटीत खडे टाकणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली – विश्वजित कदम

शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांसह अन्य आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकाशाळांमध्ये हे चित्र पाहायला मिळाले. शाळेच्या पहिल्या दिवशीच प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय गणवेश देण्याचा उपक्रम राबवता आला नाही. गणवेश वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अडचण निर्माण झाली. येत्या काही दिवसांत गणवेश उपलब्ध होतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा – सातारा : कास पठाराला सुरक्षेसाठी तंगूस जाळी बसवण्यास सुरुवात

आयएएस अधिकाऱ्याने घेतला वर्गावर तास

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या १६५ प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग भरविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. एवढेच नव्हे तर सुरू झालेल्या अंगणवाडीमध्ये आव्हाळे यांनी स्वतःच्या मुलीला प्रवेश दिला आहे. अंगणवाडीत मिळणारा आहार सर्व चिमुकल्यांसह आव्हाळे यांची मुलगीही घेत आहे. दरम्यान,शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील प्राथमिक केंद्र शाळेत जाऊन इयत्ता पहिलीच्या वर्गावर सेमी इंग्रजीचा पाठ घेतला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनीही तेवढाच चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.