नांदेड : येत्या १५ ऑगस्टपूर्वी नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना केली जाण्याची शक्यता आहे. नांदेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, अशी घोषणा येथे केली होती. पोलीस आयुक्तालयाला मंजुरी मिळाल्यानंतर आयुक्तालयासाठी पोलीस उपमहानिरीक्षक (डी.आय.जी.) दर्जाचा अधिकारी येथे नियुक्त केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक दर्जाचे दोन उपायुक्त आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाचे तीन सहायक पोलीस आयुक्त तसेच इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी अशी याची रचना असेल. सध्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी वापरले जाणार आहे. 

Pradhan Mantri Awas Yojana,
पंतप्रधान आवास योजना, राज्याची वाटचाल संथगतीनेच! अद्याप दोन लाख घरांच्या कामाला प्रारंभ नाही
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

गृहमंत्री वळसे पाटील यांनी गेल्या शनिवारी दुपारी पोलीस महानिरीक्षक कार्यालयात नांदेड, हिंगोली, परभणी व लातूरच्या पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. या बैठकीत नांदेड शहर आणि जिल्ह्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. पोलीस आयुक्तालयाच्या प्रलंबित विषयावरही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.  

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांपैकी केवळ औरंगाबाद जिल्ह्यात महानगरसाठी पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अधीक्षक अशी पोलीस प्रशासनाची विभागणी आहे. त्यानंतर विभागातले दुसरे पोलीस आयुक्तालय आता नांदेडच्या उंबरठय़ावर आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आल्यानंतर त्यास मान्यता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, कारण पालकमंत्री अशोक चव्हाण हे आयुक्तालयासाठी आग्रही होते, असे सांगण्यात आले. 

उपविभागांची पुनर्रचना होणार का?

जिल्ह्यात सध्या ३६ पोलीस ठाणी असून त्यातील १० पोलीस ठाणी आयुक्तालयात गेल्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित ठाण्यांवर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांचे नियंत्रण राहील. ग्रामीण भागातील सध्याच्या उपविभागांची पुनर्रचना होणार का? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. नांदेड ग्रामीण, इतवारा, वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर आणि विमानतळ ही शहरी भागातली ६ पोलीस ठाणी आयुक्तालयांतर्गत येतील. त्याशिवाय शहरालगत असलेल्या उस्माननगर, सोनखेड, लिंबगाव या पोलीस ठाण्यांना आयुक्तालयाच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव आहे. आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पुढील टप्प्यात शहरी भागात एक किंवा दोन नव्या पोलीस ठाण्यांची भर पडण्याची शक्यता आहे.