पाऊण तास आधी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वर उत्तरांसह प्रश्नपत्रिका प्रसारित, गुन्हा दाखल

कर्जत : इयत्ता बारावीचा गणिताचा पेपर श्रीगोंदा येथे आज, सोमवारी फुटला. शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इयत्ता बारावीच्या गणिताची सोमवारी परीक्षा होती. तो पेपर श्रीगोंदा शहरात सकाळी फुटल्याने एकच गोंधळ उडाला. श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास  उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलवर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर प्रसारित झाला. शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे.

chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Five thousand prisoners who were released on parole during the Corona period are outside the prison
करोनाकाळात ‘पॅरोल’वर सुटलेले पाच हजार कैदी कारागृहाबाहेरच
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
Youth muder in wadi
नागपूर : गांजा पिण्यावरून वाडीत युवकाचा भोसकून खून

आज, सोमवारी सकाळी साडेदहाला गणितचा पेपर होता. मात्र तत्पूर्वीच पावणे दहा वाजच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित   मिळाली . याही अधिक काळ आधीच हा पेपर फुटला असावा, याला दुजोरा मिळत आहे. या पेपरसाठी श्रीगोंदा तालुक्यात सुमारे तीन हजार विद्यार्थी बसले असून समाजमाध्यमांद्वारे प्रश्नपत्रिका उत्तरासहित वितरित झाल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली.

जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी

दरम्यान पेपरफुटीच्या घटनेची दखल जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडुस यांनी तात्काळ दखल घेत श्रीगोंदा येथे येऊन सर्व परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी गट शिक्षणाधिकारी श्री वाळके यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी लेखी तक्रार देण्याच्या सूचना दिल्या.

परीक्षा सुरू झाल्यानंतर तासाभराने पेपर फुटला

गणिताचा पेपर फुटल्याची मी माहिती घेतली. प्रत्यक्षात पेपर साडेदहाला सुरू झाला आणि माझ्या माहितीप्रमाणे ११ वाजून २५ मिनिटांनी समाजमाध्यमांवर प्रश्नपत्रिका सर्वत्र प्रसारित झाल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे पेपर सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका श्रीगोंदा येथे फुटलेली नाही. पेपर सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिका कशी बाहेर आली  आणि ती विद्यार्थ्यांना कधी मिळाली हे पोलीस तपासाचे काम आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गट शिक्षणाधिकारी यांना लेखी तक्रार देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

– अशोक कडुस,  जिल्हा शिक्षणाधिकारी