कराड : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळपासून कोयना धरणाच्या दरवाजांवर देशप्रेम व्यक्त करणारा तिरंगा ‘लेसर शो’चे नयनरम्य प्रदर्शन धरण व्यवस्थापनाने साकारले आहे. त्यास समाजमाध्यमांवर सर्वाधिक पसंती मिळत आहे. देशाच्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोयना धरण व्यवस्थापनाने धरणाचे सहा वक्र दरवाजे अर्ध्या फुटांवर उचलून धरणातून कोयना नदीपात्रात जलविसर्ग सुरू केला आहे. या एक सलग ओसंडत्या पांढऱ्या शुभ्र पाण्यावर तिरंगा ‘लेझर शो’चे नयनरम्य प्रदर्शन घडवले आहे. त्याची छायाचित्रं आणि चलचित्रं समाजमध्यमांवर प्रदर्शित करण्यात आली. त्यास प्रचंड पसंती मिळताना हा तिरंगा लेसर शो समाजमध्यमांवरुन सातासमुद्रापार पोहचला. हेही वाचा >>>Imtiyaz Jaleel : “उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लिम मतं चालतात पण मग..”, इम्तियाज जलील यांचा सवाल कोयना धरणाचा जलसाठा ९०.६३ अब्ज घनफुटांवर (टीएमसी) स्थिर असताना धरणाच्या सांडव्यावरून हा जलविसर्ग करीत एक सलग फेसाळत ओसंडणाऱ्या पाण्यावर दरवर्षीप्रमाणे समाजमध्यामांवर प्रदर्शित केलेला हा 'तिरंगा लेसर शो' लोकांना भुरळ पाडून आहे. अनेकांनी त्याची छायाचित्रं आणि चलचित्रं समाजमध्यमांवर वेगवेगळ्या दर्शनी व विशिष्ट जागेवर (डीपी आणि स्टेटस् ) प्रदर्शित करुन आपले देशप्रेम व्यक्त केले आहे.