scorecardresearch

जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना झाला स्फोट ; तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

महाड तालुक्यात पोलिसांनी जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट करत असताना झालेल्या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

अलिबाग –  जप्त केलेली स्फोटकं निकामी करतांना तीन पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना,  महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड गावाजवळ घडली. जखमी झालेल्या पोलीसांवर महाड ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबईत हलविण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीना मुंबईत नेत्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर ग्रीन कॉरीडोर तयार करण्यात आला होता. 

महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये पूर्वी जप्त केलेला विस्फोटक मुद्देमाल नष्ट करण्याचे बॉम्ब रोधक पथकाला मिळाले होते. त्यानुसार अलिबाग येथून तीन कर्मचारी स्फोटके निकामी करण्यासाठी महाड मध्ये दाखल झाले होते.  कांबळे तर्फे महाड येथील एका दगड खाणे हा मुद्देमाल नष्ट करण्याचे काम सुरु होते. यावेळी मोठा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये  राहुल पाटील,  रमेश कुटे, आशीर्वाद लगदे हे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

 जखमी झालेल्या तिनही पोलीसांना महाड येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीसांनी मुंबई गोवा महामार्गावर ग्रीन कॉरीडोर तयार करून जखमींना मुंबईत हलविले.    या स्फोटामुळे परिसरातील कांबळे तर्फे महाड आकले भोराव आदि गावा मध्ये मोठे दनके बसले. या धक्क्याने गावातील घरेदेखील हादरली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. आवाज होताच गावातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी प्रतिमा पुडलवाड,  तहसीलदार सुरेश काशीद आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explosion occurred destroying confiscated items two policemen seriously injured ysh

ताज्या बातम्या