राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. विमान एवढा भीषण होता की विमान जळून खाक झालं. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती. यासाठी अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाला.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातल्या प्रमुख नेत्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी माझा जवळचा मित्र गमावला अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

अजित पवारांचे कुटुंबीय राजकारण, समाजकारणात प्रदीर्घ काळ सक्रिय आहेत. शरद पवार शांत, संयमी म्हणून ओळखले जातात. अजित पवार हे रोखठोक, खणखणीत आणि दिलखुलास बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. प्रशासनावर घट्ट पकड असलेले अजित पवार ‘अजितदादा’ म्हणूनच राजकीय क्षेत्रात प्रसिद्ध. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची हातोटी.

शरद पवार- माजी मुख्यमंत्री. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक. माजी केंद्रीय मंत्री. ५ दशकं राजकारणात सक्रिय.

प्रतिभा पवार- शरद पवार यांच्या पत्नी. शरद पवारांना भक्कम साथ आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत

सुप्रिया सुळे- शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची कन्या. बारामतीतून तीन वेळा खासदार. शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष

विजय आणि रेवती- सुप्रिया सुळे यांचा मुलगा आणि मुलगी
………….

शरद पवार कुटुंबीय राजकारणाच्या बरोबरीने सहकार, शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

अनंतराव पवार- शरद पवारांचे बंधू आणि अजित पवार यांचे वडील

अजित पवार यांचे कुटुंबीय

सुनेत्रा पवार- अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार

पार्थ पवार आणि जय पवार हे अजित पवारांचे चिरंजीव.

पार्थ राजकारणात सक्रिय. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं.

जय पवार कौटुंबिक उद्योगांचं व्यवस्थापन बघतात. गेल्या वर्षी झालेल्या त्यांच्या साखरपुड्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते.

…………..

रोहित पवार- शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते.

युगेंद्र पवार- अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा मोठा मुलगा.