शेतात नवीन विहीर खोदण्यापूर्वी भूमिपूजन करताना पोकलँडचे बकेट कोसळून डोक्यावर पडल्याने त्यात शेतकऱ्याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील देवळाली येथे ही दुर्घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीकृष्ण गुंड (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी पोकलँड चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मृत श्रीकृष्ण गुंड यांनी आपल्या शेतात नवीन विहीर खोदायचे ठरविले होते. त्यासाठी भाड्याने पोकलँड मागविले होती. विहीर खोदण्यासाठी शेतात पोकलँड येऊन थांबले होते.

तत्पूर्वी, गुंड हे विहीर खोदण्याच्या जागेचे पूजन करीत असताना त्यांच्या डोक्यावरच पोकलँडचे जाड लोखंडी बकेट होते. परंतु पूजा सुरू असताना अचानकपणे पोकलँडचे लोखंडी बकेट निसटून गुंड यांच्या डोक्यावर कोसळले. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer dies pokland bucket collapses he praying to dig a well karmala devkali amy
First published on: 27-06-2022 at 15:19 IST