साखराळे (ता.वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी प्रशांत अधिकराव पाटील यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी अकाली निधन झाले असून त्यांच्या पत्नी वनिता व पाटील कुटुंबीयांनी विधवा प्रथा न पाळण्याचा आणि विधवा महिलांना मान-सन्मान देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

प्रशांत पाटील यांचे नुकतेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असून, त्यांच्या अचानक जाण्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीचे सौभाग्याचे लेणे समजले जाणारे कुंकू पुसणे, गळ्यातील मणी मंगळसूत्र, जोडवी काढून बांगड्या फोडणे अशी कोणतीही अनिष्ट प्रथा त्यांनी पाळली नाही. त्यांच्या या क्रांतिकारी व आधुनिक विचारांचे साखराळे व परिसरात स्वागत करण्यात येत आहे.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की

हेही वाचा – सोलापूर : भीमा कुस्ती स्पर्धेत सिकंदर व महेंद्र सहभागी होणार, पण..

हेही वाचा – अखेर सस्पेन्स संपला? ठाकरे-आंबेडकर युतीबाबत सुभाष देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

प्रशांत पाटील यांच्या पश्चात पत्नी वनिता, इयत्ता दहावीमध्ये शिकणारी कन्या साक्षी, इयत्ता सातवीमध्ये शिकणारा चिरंजीव सोहम, आई, दोन भाऊ, भावजयी, पुतणे, चुलते-चुलत्या, चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती विजया पाटील माजी सरपंच असून त्यांचे थोरले भाऊ अविनाश पाटील हे माजी उपसरपंच, तंटामुक्ती समिती व राष्ट्रवादी सेवा दलाचे अध्यक्ष आहेत.